पाटण : ज्याची महती जगभर आहे, अशा कोयना धरणावरील व्यवस्थापनाचे काम पाहणारी तब्बल दोन विभागासहित नऊ उपविभागीय कार्यालये बंद करून कोयना धरणाचे नियंत्रण तेथेच असणाऱ्या कोयना बांधकाम विभागामार्फत करण्याचा मानस जलसंपदा विभागाचा असल्यामुळे कोयना धरणावरील कार्यालये गोठणार असल्याच्या हालचाली आहेत. यासंदर्भात अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते,, कार्यकारी अभियंता एम. आय. धरणे यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपलब्ध होऊ शकले नाही.कोयना धरणाच्या जलाशयासहित अवतीभोवतीचा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येतो. त्यामुळे या परिसरात कोणतेही खाणकाम किंवा बांधकाम करावयाचे झाल्यास त्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. जागतिक वारसास्थळ म्हणून कोयना धरण व्यवस्थापनाचा गाशा गुंडाळावा लागणार की येथील कार्यालये बिनकामाची ठरलेली आहेत, अशी कारणे आता चर्चेस येऊ लागली आहेत. कोयना धरण व्यवस्थापनासहित कोळकेवाडी धरण व्यवस्थापन, कोयना बांधकाम विभाग हे तीन विभाग आहेत. तसेच रस्ते व इमारती, उपकरण, धरण व्यवस्थापन, संकिर्ण विभाग अशी १७ उपविभागीय कार्यालये आहेत. सध्या कोयना धरणाचे मुख्य अभियंता ए. व्ही. पानसे हे आहेत. त्यांचे कार्यालय पुणे येथे आहे, तर अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते यांचे कार्यालय सातारा येथे आहे. त्या व्यतिरिक्त कार्यकारी अभियंता एम. आय. धरणे यांच्या अधिपत्याखाली कोयना धरण व्यवस्थापनाचा कारभार सध्या सुरू आहे. त्यांची बदली काही महिन्यांपूर्वी झाली आहे. तसेच इतर रिकामी झालेली पदेदेखील अद्याप भरलेली नाहीत. त्यातच आता थेट कोयनेतील कार्यालयेच बंद करण्याचे संकेत दिसू लागले आहेत. (प्रतिनिधी)कोयना धरणावरील कार्यालये बंद करण्यासंदर्भात मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक झाली आहे. मात्र, कोयना धरण व्यवस्थापनातील कार्यालये बंद करण्याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. - ए. टी. कसबे,कार्यकारी अभियंता, अलोरा वीज निर्मिती केंद्र कोयनेतील कार्यालये बंद झाली तरकोयना धरण प्रकल्पावरील कार्यालये बंद करण्यात आली तर कालांतराने कोयना जलाशय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिदुर्गम भागामध्ये व्यापला जाईल. वन्यजीव विभागाचे कडक निर्बंध येतील, कोयना बाजारपेठेला फटका बसेल आणि धरण व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील तर स्थानिक कामगार व मजुरांवर बेकारीची वेळ येईल तसेच कोयना धरण संरक्षणात बाधा येईल.कोयना धरणावरील कार्यालये बंद होणार, याबाबत अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. मात्र, आमदार शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे राजाभाऊ शेलार यांच्यासहीत सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यालय बंद करण्यास विरोध दर्शविला आहे. ही कार्यवाही लवकरात लवकर न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
‘कोयने’वरील कार्यालये गोठवण्याच्या हालचाली
By admin | Published: February 15, 2015 8:44 PM