नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी २५ जुलैच्या आंदोलनावेळी नवी मुंबईत हिंसेच्या घटना घडल्या होत्या. ९ आॅगस्टच्या आंदोलनाला पुन्हा गालबोट लागू नये याकरिता शहरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन अथवा बंद केला जाणार नसल्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.२५ जुलैच्या आंदोलनावेळी नवी मुंबईत ठिकठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून दोन गटांत उद्भवलेल्या वादातून कोपरखैरणेत एका आंदोलकाचा मृत्यू झाला. आंदोलनात मिसळलेल्या काही हिंदी भाषिक समाजकंटकांकडून हिंसा घडवली जात होती. त्यांच्यामुळेच स्थानिक विरुद्ध मराठा असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. दोन्ही समाजात अनेक वर्षांपासून एकोपा असून तो भविष्यातही टिकून राहावा ही सर्वांची इच्छा आहे. परंतु ९ आॅगस्टला पुन्हा मराठा आरक्षणासाठी शहरात बंद अथवा आंदोलन केल्यास हिंसेची पुनरावृती होऊ शकते. पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता नवी मुंबईला आंदोलनातून वगळल्याची घोषणा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली. एपीएमसी येथील माथाडी भवनमध्ये झालेल्या बैठकीअंती हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी सकल मराठा आरक्षण समितीचे समन्वयक अंकुश कदम यांनी आंदोलनाला गालबोट लावून समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. आजवर आरक्षणाच्या मोर्चा, बंदला कसलेही गालबोट लागलेले नाही, तर प्रत्येक आंदोलनावेळी स्थानिकांनी पुरेपूर सहकार्य केले आहे. त्यामुळे दोन्ही समाजात निर्माण झालेली दरी मिटवण्यासाठी संयुक्तरीत्या हा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.नवी मुंबईत पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांकडून पुरेपूर प्रयत्न होत आहेत. त्यानुसार दोन्ही समाजाच्या प्रमुखांनी तरुणांना सामंजस्याने राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही काहींनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाईचे पोलिसांना पूर्णपणे स्वातंत्र्य राहणार असल्याचेही सूचित केले आहे.मुंबईतील समन्वयकांनी घेतलेल्या बैठकीत सर्व मराठा बांधवांनी एकत्रित येत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमण्याचे आवाहन केले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान मोठ्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या देतील. तसेच समन्वयकांचे शिष्टमंडळ उपनगराचे जिल्हाधिकारी यांना मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन देतील. ज्या मराठा बांधवांना वांद्रे येथे पोहोचता येणार नाही, त्यांनी काळ्या फिती लावून कामाच्या ठिकाणी मराठा समाजावरील अन्यायाचा निषेध नोंदविण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.>मुंबईत देणार ठिय्यामुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समन्वयकांनी गुरुवारी,९ आॅगस्ट रोजी वांद्रे येथील चेतना महाविद्यालयानजीक असलेल्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देण्याचा निर्णय घेतला आहे. दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये असलेल्या राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनातून नवी मुंबई बाहेर, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 5:34 AM