ठाणे - महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम सुधारणा पत्र २०१८ नुसार नवीन कायदा केला जाणार आहे आणि या कायद्यामुळे खाजगी शाळांना फी वाढी संदर्भात एकतर्फी अधिकार मिळणार आहे. ज्यामुळे खाजगी शाळांत शिकणाऱ्या मुलांचे शिक्षण आणखी महाग होणार आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी शेकडो पालकांनी महापालिका मुख्यालयासमोर मुक मार्च काढला होता. यावेळी राज्य शासनाने हा प्रस्ताव मागे घ्यावा आणि पालकांना न्याय देणारा कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच यावेळी जिल्हाधिकाºयांना सुध्दा या संदर्भातील निवेदन देण्यात आले. ठाण्यात शुक्रवारी खाजगी शाळांमध्ये शिकत असलेल्या मुलांच्या पालकांनी दंडाला काळ्या फीत बांधून हातात निषेधाचे फलक घेऊन शांतेत ठाणे महापालिकेसमोर मोर्चा काढला. तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे राज्य सरकार पर्यंत पोहोचवावे अशी विनंती पालकांनी पत्रकाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम सुधारणा पत्र २०१८ नुसार नवीन कायदा केला जाणार आहे त्यानुसार २५ टक्के पालक एकित्रत येऊन विरोध केला पाहिजे, फी वेळेवर नाही दिली तर लेट फी तसेच व्याज लावणार, फी रेग्युलेशन कमिटीवर शाळेचेच प्रतिनिधी असतील, पालकांचा सहभाग असणार नाही, शाळेची फी कोणत्या कारणासाठी घेऊ शकता (जिम, इंटरनेट सेवा, साफ सफाई, शौचालय सुविधा अशा प्रकारे कोणतीही कारणे ) पहिली ते पाचवी आणि सहावी ते १० वी इयत्तेतील फीमध्ये प्रंचड तफावत असणार आहे. त्यामुळे पालकांचे यामुळे कंबरडे मोडणार आहे. येत्या हिवाळी अधिवेषनात हे बील मंजुरीसाठी पटलावर ठेवले जाणार आहे. परंतु हे बील रद्द करुन पालकांच्या हिताचे बील करण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे पालकांचे म्हणने आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्यांनी विश्वासघात केल्याचा संताप यावेळी पालकांनी व्यक्त केला. आज याला विरोध केला नाही तर उद्याच्या पिढिला शिकणे अवघड होणार असल्यानेच आतापासून हे आंदोलन करण्यात येत असल्याचेही पालकांनी सांगितले. अनेक खाजगी शाळा या अवास्तव फी वाढ करीत आहेत. त्याच्याविरोधात अनेकवेळा तक्रारीसुध्दा करण्यात आलेल्या आहेत. परंतु अद्याप त्यावर कारवाई झालेली नसल्याचा आरोपही यावेळी पालकांनी केला.राज्य शासनाने हे बील रद्द करुन पालकांना दिलासा द्यावा, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र होईल.(सुशील बर्डे - पालक)खाजगी शाळा वारंवार फी वाढ करीत आहेत. त्यात राज्य शासनाने आता जे बील आणले आहे, त्यामुळे खाजगी शाळांवाले अवाच्यासव्वा फी वसुल करणार आहेत. त्यामुळेच याला आतापासूनच आम्ही विरोध करीत आहोत.(निरज पाटील - पालक)
खाजगी शाळांच्या फी वाढी विरोधात पालकांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 4:33 PM
खाजगी शाळांच्या फि वाढी विरोधात शुक्रवारी ठाण्यातील पालकांनी महापालिका मुख्यालयासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यावेळी शेकडो पालक या आंदोलनात सहभागी झाले होते.
ठळक मुद्देराज्य शासनाने बील मागे घ्यावेपालकांच्या हिताचे बील असावे