लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने येत्या २० जुलै रोजी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू होईपर्यंत १ एप्रिल २०१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ कामगारांना देण्यात यावी, १ जुलै २०१६ पासून वाढीव ७ टक्के महागाई भत्त्याची रक्कम शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना रोखीने दिली. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तो देण्याबाबत वेतन करारात तरतूद असूनही वाढीव महागाई भत्त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या मागण्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्या, अशा अनेक मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. एसटी कामगार संघटनेचे (मान्यताप्राप्त) अध्यच संदीप शिंदे यांनी सांगितले की, २० जुलैला राज्यात विभागीय कार्यालयात कर्मचारी ‘चड्डी बनियन’वर आंदोलन करतील. तर मुंबई मुख्यालयावर आॅगस्ट महिन्यात महिला कर्मचारी आंदोलन करतील.
एसटी कर्मचाऱ्यांचे २० जुलैला आंदोलन
By admin | Published: July 16, 2017 1:19 AM