शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

आंदोलन सुरूच, दूधटंचाई नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 6:14 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असले, तरी बुधवारी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये विशेष टंचाई जाणवली नाही.

कोल्हापूर/नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असले, तरी बुधवारी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये विशेष टंचाई जाणवली नाही. पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. दुसरीकडे सरकारनेच आंदोलकांनाच गनिमी कावा दाखवित, नाशिकमार्गे गुजरात व मुंबईला मोठ्या प्रमाणावर टँकर रवाना केले आहेत. नाशिकमध्ये पोलिसांनी आंदोलकांच्या मुसक्या आवळल्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते भूमिगत झाले. बुधवारी नाशिक, जळगाव व धुळे जिल्ह्यातून सुमारे ४ लाख ७१ हजार लीटर दूध बाहेर रवाना झाले. दिवसभरात ६० टॅँकर नाशिकमार्गे पाठविण्यात आले.दुधाच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने, सरकारची नाकेबंदी करण्यासाठी गुरुवारपासून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. शेतकरी जनावरांसह रस्त्यावर उतरणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात दूध संकलन खूप कमी झाले असले, तरी पोलीस बंदोबस्तात खासगी दूध संस्थांचे टँकर शहरांकडे रवाना होत आहेत. बुधवारी अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ करत दूध रस्त्यावर ओतले.>राजू शेट्टी गुजरात सीमेवरअहमदाबाद मुंबई सेंट्रल पॅसेंजरने गुजरातहून चार लाख लीटर दूध मुंबईत येणार होते. खा. राजू शेट्टी डहाणूला ठिय्या देऊन होते. मात्र, गाडीला दुधाचे डबे नव्हते. त्यावर, हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.>मुंबईत दोन दिवस पुरेल एवढा साठामुंबईत दूधपुरवठा करणाºया ‘आरे’ व ‘महानंद’ने दोन दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा असल्याची माहिती दिली आहे, पण लोक दुधाची अधिक खरेदी करत आहेत. तरीही टंचाई भासलेली नाही.>आज नागपुरात महत्त्वाची बैठकगुरुवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. साखरेप्रमाणे निश्चित दर हाच दुधावर तोडगा असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात तिसºया दिवशी बुधवारी आष्टी (जि. बीड) येथे दूध उत्पादक शेतकºयांनी एकाला दुग्धस्रान घातले.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाmilkदूधRaju Shettyराजू शेट्टी