शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये फिल्म अर्काइव्ह !

By admin | Published: August 23, 2016 7:01 PM

भारतीय चित्रपटांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा यादृष्टीने एनएफएआयच्या धर्तीवरच विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये फिल्म अर्काइव्ह सुरू करण्यात येणार आहेत

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २३ : भारतीय चित्रपटांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा यादृष्टीने एनएफएआयच्या धर्तीवरच विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये फिल्म अर्काइव्ह सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी कर्नाटक आणि केरळ याठिकाणाहून प्रस्ताव आले आहेत. चित्रपट संवर्धनाच्या दृष्टीने अर्काइव्ह स्थापन करण्याची इच्छा असलेल्या राज्यांना केंद्राकडून आर्थिक तसेच तांत्रिकदृष्ट्या यंत्रणा उभारण्यास सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी दिली.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे नँशनल फिल्म हेरिटेज मिशन ची पुढील रूपरेषा ठरविण्याबरोबरच उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती मित्तल यांनी पत्रकारांना दिली. याप्रसंगी मंत्रालयाचे अतिरिक्त  सचिव आणि आर्थिक सल्लागार सुभाष शर्मा, सहसचिव संजयमूर्ती, चित्रपट विभागाचे महासंचालक मुकेश शर्मा, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, नँशनल फिल्म हेरिटेजचे मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा आणि डी.जे  नारायण उपस्थित होते.

संपूर्ण देशभरामध्ये एकमेव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे पुण्यात आहे, याच ठिकाणी देशभरासह विदेशातील चित्रपटांचे संकलन करून त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम केले जाते. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचे देखील जतन व्हावे यासाठी त्या त्या भागातील राज्य सरकारने ह्यफिल्म अर्काइव्हह्ण स्थापन करण्यासंबंधी पुढाकार घेण्याची गरज आहे.

सध्या केरळ आणि कर्नाटक राज्यांकडून असे प्रस्ताव आले आहेत. चित्रपट जतनासाठी प्रादेशिक अर्काइव्ह निर्मित करण्यास इच्छुक असणा-या राज्यांना केंद्राकडून आर्थिक निधीसह तांत्रिकदृष्ट्या सहकार्य केले जाईल. तसेच विविध विद्यापीठांसहशैक्षणिक संस्थांमध्ये चित्रपट संवर्धनाच्या दृष्टीने एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता विद्यापीठांशी चर्चा करण्यात आली असून, यासाठी 40 विद्यापीठांची निवड करण्यात आली आहे. कंपन्यांना सीएसआरनुसार 2 टक्के रक्कम सामाजिक कार्यक्रमांसाठी देता येते, कंपन्यांकडूनही चित्रपटांचे जतन करण्यासाठी निधी स्वीकारला जाईल.

अर्काइव्हसाठी खाजगीकरणाचाही मार्ग आता खुला करण्यात आला असल्याचे मित्तल यांनी स्पष्ट केले. चित्रपटांचे जतन डिजिटल फॉरमँट मध्ये करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशविदेशातील विविध भागांमधून चित्रपटांचे संकलन केले जात आहे,कामाच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याने एनएफएआयमधील कर्मचारी संख्येत दुप्पटीने वाढ करण्याबरोबरच कोथरूडच्या एनएफएआयमध्ये नवीन व्हॉल्टस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.आकाशवाणी आणि पीआयबी कायम रहाणारपुण्यातील आकाशवाणीसह पीआयबीचे केंद्र बंद होणार?यावरून वाद निर्माण झाले. मात्र दोन्ही केंद्र बंद किंवा स्थलांतरित होणार नाहीत. आकाशवाणीच्या पुणे वृत्तविभागासह प्रेस इंफॉरमेशन ब्युरो (पीआयबी) कायम रहाणार असल्याचे स्पष्टीकरण मित्तल यांनी दिले.एफटीआयआयला पुन्हा नववैभव प्राप्त करून देणारएफटीआयआयची जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेक प्रतिभावंत कलाकारांची फळी संस्थेतून बाहेर पडली आहे. मध्यंतरीच्या काळात जे काही वाईट घडले ते विसरून संस्थेला पुन्हा नववैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.