ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मुलुंड बस आगारमधील 402 क्रमांकाची बस मुलुंड स्टेशन(पश्चिम) येथून वैशाली नगरकडे जात असताना बसनं अचानक पेट घेतला. नेताजी सुभाषचंद्र मार्ग येथे संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बसचालकाला बसमधून जळाल्याचा वास येऊ लागला. यावेळी बसमधून उतरुन पाहिले तर इंजिनला आग लागल्याचे समजले.
खबरदारी म्हणून यावेळी बसचालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले व फायर ब्रिगेडला पाचारण केले. फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी बसमध्ये एकूण 15 प्रवासी होती. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.