शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

चालत्या टॅक्सीत प्रवाशाला लुटले

By admin | Published: July 12, 2017 4:59 AM

गिरगावात चालत्या टॅक्सीत गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्याकडून प्रवाशाची लूट झाल्याची घटना गिरगावात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गिरगावात चालत्या टॅक्सीत गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्याकडून प्रवाशाची लूट झाल्याची घटना गिरगावात घडली. यामध्ये ३० लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात फसवणूक, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.गिरगाव परिसरात २७ वर्षीय मफ्फाराम गणेशाराम देवाशी कुटुंबीयांसोबत राहतो. तो खासगी कंपनीत काम करतो. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास गिरगाव परिसरात त्याला काही जणांनी अडविले, तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून टॅक्सीत बसविले. त्यानंतर, चालत्या टॅक्सीतच त्याच्याकडील पैशांची रोकड, त्याचा मोबाइल हिसकावला. त्याच्याकडे ३० लाख रुपयांची रोकड होती. त्यानंतर, देवाशीला मारहाण करून चालत्या टॅक्सीतून भुलेश्वर रोड परिसरात खाली उतरविले. त्याने तत्काळ व्ही.पी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. देवाशीने दिलेली माहिती व गुप्तमाहितीदारांच्या मदतीने अधिक तपास सुरू असताना, या लुटीमागील महत्त्वाचे धागेदोरी हाती लागले असल्याची माहिती व्ही. पी. रोड पोलिसांनी दिली.