महापालिकेचा एससीआयशी प्राथमिक करारनागपूर: संत्रानगरी नागपूरचा विकास स्मार्ट सिटीच्या धर्तीवर करण्याचा मार्ग प्रशस्त होत असून याचाच एक भाग म्हणून बुधवारी अमेरिकेच्या सिस्टर सिटी इंटरनॅशनल (एससीआई)सोबत महापालिकेने प्राथमिक करारावर स्वाक्षरी केलीे.महापौर प्रवीण दटके आणि एससीआईच्या संचालक मंडळाचे प्रमुख बिल बोरियम यांच्या उपस्थितीत हा करार झाला. करारावर एससीआईचे ग्लोबल को-आॅर्डिनेटर हंसा पटेल आणि अ.भा.स्थानिक स्वराज्य संस्थाचे संचालक जनरल रणजित चव्हाण यांनी स्वाक्षरी केली. नागपूरला कॅलिफोर्नियाच्या सेटाक्लारा शहराशी जोडण्यावर सहमती झाली. नागपूर प्रमाणेच कॅलिफोर्नियाची संत्री प्रसिद्ध आहेत. या समानतेमुळेच हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.करारानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर प्रवीण दटके म्हणाले की, स्थानिक पातळीवरील आर्र्थिक, शैक्षणिक, सामाजिक, व्यापारिक मुद्यांवर या करारानुसार आदानप्रदान केले जाईल. पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक सुधारणा यावर भर दिला जाईल.एमसीआईच्या चमूने महापालिकेत येण्यापूर्वी सेवाग्राम, व्हीएनआयटी, दीक्षाभूमी, झिरोमाईल्सचा आढावा घेतला. अमेरिकेच्या या संस्थेने देशभरात १७ शहरांसोबत करार केले आहेत. नागपूर हे १८ वे शहर आहे. सादरी करणाच्या माध्यमातून महापालिकेने २४ बाय ७,एसटीपी प्लॅन्ट, कचरा व्यवस्थापन याबाबतची माहिती दिली. बुधवारी झालेला करार प्राथमिक स्वरूपाचा आहे. महापालिकेने पाठविलेल्या करारावर चर्चा होईल. अंतिम करार दोन्ही शहरांच्या महापौरांच्या उपस्थितीत होईल. विदेशातील नागपूरकरांच्या प्रयत्नांमुळेच ही बाब शक्य होईल. कराराच्या वेळी यावेळी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, सत्ता पक्ष नेते दयाशंकर तिवारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नागपूर शाखेचे अध्यक्ष जयंत पाठक, नागपूर फर्स्टचे समन्वयक शैलेश देशपांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)लोकसहभागातील प्रकल्पाचे कौतुकमहापालिकेने लोकसहभागातून अनेक यशस्वी उपक्रम राबविले आहे. याची करारादरम्यान चर्चा झाली. पौर्णिमेच्या दिवशी एक तास वीज बंद ठेवणे आणि लोकसहभागातून नाग आणि पिवळी नदीची स्वच्छता मोहीम हे उपक्रम बिल बोरियम यांना आवडले. कराराचे फायदेशहर ते शहर एक्सचेंज प्रोग्रामतंत्रज्ञान आणि अनुभवांचे आदानप्रदानस्मार्ट सिटी अभियानासोबत जुळणेसंशोधन व सूचनांचे आदानप्रदानवैश्विक व्यासपीठ तयार होणे
संत्रानगरीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल
By admin | Published: January 29, 2015 1:05 AM