कोल्हापूर,दि. 8 - कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराजने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे तब्बल 19 वर्षांनंतर एका भारतीय रेसरने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे सातासमुद्रापार जाऊन कोल्हापूरचा झेंडा रोवणाऱ्या कृष्णराजवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
19 वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयनने अशी कामगिरी केली होती. त्यानंतर आता कृष्णराजनं ही कामगिरी केली आहे. पहिल्या रेसमध्ये कृष्णराज महाडिक आठव्या स्थानावर होता. मात्र, जिद्दीच्या जोरावर त्यानं सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले.