शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रवी राणा, नवनीत कौर राणा बुलेटवरून विनामास्क सुस्साट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:00 PM

mp navneet rana and her husband mla ravi rana without helmet: राणा दाम्पत्याकडून नियम धाब्यावर; अद्याप कारवाई नाही

अमरावती: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ६,११२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. जवळपास तीन महिन्यांमध्ये प्रथमच राज्यात एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून आले. अमरावती, यवतमाळ, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र लोकप्रतिनिधींना याचं किती गांभीर्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (mp navneet rana and her husband mla ravi rana riding a bullet without wearing a mask and helmet)सार्वजनिक कार्यक्रमाला महापौर जाणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णयअमरावतीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगानं वाढत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं, मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत.१० रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील, चार प्रभाग समित्यांमध्ये अधिक संक्रमणरवी राणा आणि नवनीत कौर राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात राणा दाम्पत्य कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे. दुचाकीवरून फिरणाऱ्या राणा दाम्पत्याच्या तोंडावर मास्क नाही. इतकंच काय त्यांनी हेल्मेटदेखील घातलेलं नाही. अमरावतीच्या रस्त्यांवर विनामास्क, विनाहेल्मेट रपेट मारणाऱ्या राणा दाम्पत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.राणा दाम्पत्य सर्व नियम मोडून अमरावतीत फिरत असल्यानं कायदे हे केवळ सर्वसामान्यांसाठी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अद्याप तरी राणा दाम्पत्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून राणा दाम्पत्याला नियम, कायद्यांमधून सूट देण्यात आली आहे का, असा सवाल सामान्यांना पडला आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाcorona virusकोरोना वायरस बातम्या