मुंबई – अमरावतीमध्ये कोरोना टेस्टिंगच्या नावाखाली एका तरुणीसोबत खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब नमुने घेण्यात आल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर या प्रकारावरुन राज्य सरकारवर विरोधकांनी प्रहार केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि स्थानिक खासदार नवनीत राणा कौर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
याबाबत भाजपा नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, अमरावतीतील बडनेरात अत्यंत धक्कादायक घडली, कोरोनाच्या टेस्टिंगसाठी महिलेच्या गुप्तांगामधून स्वॅब घेण्यात आला, हे करण्याची हिंमत टेक्निशियनची झाली कशी? तो मुलीला कसं घेऊन गेला? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. सरकारने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, स्वॅब टेस्टिंग फक्त नाकाद्वारे केली जाते, आज या मुलीने हिंमत केली म्हणून हा प्रकार समोर आला, राज्यात कोरोनाच्या नावाखाली ग्रामीण भागातील महिलांना काय काय प्रकार सहन करावा लागला असेल? असा भीती त्यांनी व्यक्त केली.
तसेच दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. महिलांच्या जगण्याचा सन्मान हिरावला जात आहे, क्वारंटाईन सेंटर महिला, मुली सुरक्षित नाही, बाहेर नाहीत आणि आता या स्वॅब टेस्टिंगच्या नावाखाली कुठे काय घडले असेल हे सांगता येत नाही. महिला सुरक्षेबाबत सरकारचं लक्ष नाही, अत्यंत वाईट आणि निंदनीय घटना महिलांसोबत घडत आहे, त्यामुळे महिलांबाबत बोलणारे नेते आता कुठे गेलेत? दिशा कायद्याचं काय झालं? महिलांची सुरक्षा पूर्णपणे देवाच्या भरवशावर आहे असा टोलाही चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणात पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. महिला सक्षम झाल्यानं मी खासदार झाले, प्रतिभाताई देशाच्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या, याच जिल्ह्यातील महिला आमदार पालकमंत्री आहेत तरीही असे धक्कादायक प्रकार होत आहेत. कोविड रुग्णांचे हाल सुरु आहेत. आरोग्य यंत्रणा संपूर्ण ढासाळली आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलंय, तर...
पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा शिवसेनेला दे धक्का; आमदाराच्या मदतीनं ५ बंडखोर नगरसेवकांना साथ
पतीला खांद्यावर बसवून गावकऱ्यांनी काढली महिलेची धिंड; अफेअरच्या संशयातून तालिबानी शिक्षा
शाब्बास पोरी! मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी; जगतेय संघर्षमय जीवन
तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच