शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

शिंदेची शिवसेना हे हास्यास्पद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद; संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 8:19 PM

बाजारबुणग्यांनी न्याय विकत घेतला, चोरला पण तराजू कसा विकत घेणार? शिंदेंनी राजकारणात कोणता विचार आणला? चोरांचे सरदार हे चोरांना साजेसे भूमिका घेतात असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

मुंबई - शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची दुसरी कुणाची शिवसेना होऊच शकत नाही. बाळासाहेबांचा विचार आक्रमक आहे. या निकालानं नक्कीच संताप आहे, वेदना आहे परंतु धक्कादायक नाही कारण हे अपेक्षित होते. अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे उमेदवार उभा केला नाही तरी चिन्ह गोठवले. ज्यांना जायचं असेल ते जातील. ज्यांच्या रक्तात, नसानसात लाचारी आहे ते मालक बदलत असतात. विचारांची शिवसेना त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरेच करतील असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, हे सर्व करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. हा देश सीरिया, इराण नाही. या देशाला फारमोठी परंपरा संस्कार आहेत. हुकुमशाहाचा अंत अत्यंत वाईट असतो. शिवसेनेच्या प्रवासाची ही सुरुवात आहे. धनुष्यबाण हे आमच्या रामानं आम्हाला दिले आहे. धनुष्यबाण आम्ही कधीच सोडणार नाही. हातात मशाल राहील. धनुष्यबाण ज्यांनी हातात घेतले ते त्यांना पेलवणार आहे का? हे बाजारबुणगे जल्लोष करतायेत. लुटीचा माल आल्यावर जल्लोष करणाऱ्यांचे राज्य खालसा होईल. भाजपाने त्यांचे अतोनात नुकसान केले आहे. काळाकुट्ट अध्याय निवडणूक आयोगाने लिहिलाय. केंद्रीय निवडणूक आयोगावर यापुढे कुणीही विश्वास ठेवणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाजारबुणग्यांनी न्याय विकत घेतला, चोरला पण तराजू कसा विकत घेणार? शिंदेंनी राजकारणात कोणता विचार आणला? चोरांचे सरदार हे चोरांना साजेसे भूमिका घेतात. ५० वर्ष आम्ही रक्ताचे पाणी करून चिन्ह घराघरात पोहचवले. अशाप्रकारे ४ लोक ठरवतात आणि निकाल देतात. या राज्याची जनता स्वस्थ बसणार नाही. भाजपाच्या अंताची सुरुवात झाली आहे. शिंदे गटाच्या अंताची सुरुवात झालीय. सगळ्या लोकशाहीतील संस्था टाचेखाली घेऊन निर्णय घेतले जातायेत हे फारकाळ चालणार नाही. हुकुमशहा आले आणि गेले अशा शब्दात राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजपाच्या अंताची सुरुवात झालीयनिकालाचे स्क्रिप्ट ३ महिन्यांपूर्वीच तयार होते. निकाल आमच्या बाजूने लागणार, चिन्ह आम्हाला मिळणार या स्क्रिप्टचं ड्राप्टिंग कुणी केले याचे उत्तर द्या. महाराष्ट्रातील जनता तुमचा मृत्यूलेख तयार करायला आज सुरूवात केली आहे. फडणवीसांची वकिली चालणार नाही. हा मुद्दा भावनिक आहे. बाळासाहेबांची शिवसेना तुमची बाजारबुणग्यांच्या हाती देता. शिवसेना फोडता. हे सगळे स्क्रिप्ट तयारच होते. चोरांनी शिरजोरी करण्याचा हा प्रयत्न आहे. निवडणुका होऊ द्या खरी शिवसेना कुणाची ते कळेल. महाराष्ट्रातल्या राजकारणात सगळ्यात मोठा विनोद म्हणजे शिंदेंचीच शिवसेना. हे सगळे हास्यास्पद आहे. पक्ष विकत घ्यायला लागल्या. दादागिरी सुरू राहिली तर लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल असंही संजय राऊत म्हणाले. 

आनंद दिघे म्हणजे शिवसेना नाही, विचार नाहीआनंद दिघे शिवसेनेत जिल्हाप्रमुख होते, त्यांना बाळासाहेबांनी पद दिले, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख होते. तुम्ही त्यांचा बाळासाहेबांच्या बरोबरीचा फोटो लावता, पंतप्रधान मोदींच्या बरोबरीचा फोटो लावता हे सगळे ठरवून चालले आहे. जसे आम्ही पक्षाचे पदाधिकारी होतो तसे ते होते. ते म्हणजे शिवसेना नाही, ते म्हणजे विचार नाही. विचार बाळासाहेबांचाच, आणि हा विचार महाराष्ट्राने ठाकरेंचा विचार म्हणून स्वीकारलाय. बाळासाहेबांच्या हयातीत उद्धव ठाकरे नेतृत्व करतील हे आम्ही सगळ्यांना ठरवलेले आहे. तुम्ही कोण ठरवणार शिवसेना कुणाची? असा सवाल त्यांनी विचारला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा