कल्याण: बेंगलोर येथील संरक्षण समितीचे संरक्षण आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ या संस्थेला काल गुरुवारी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याठिकाणी सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.
यासंस्थेत राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रस्त्र विकसीत करणे, संशोधन करणो, नवीन चाचणी करणो आदी कामे ही संस्था 6 वर्षापासून अधिक काळ काम करीत आहे. देशाला युद्ध परिस्थितीत लागणारी लढाऊ विमाने, रॉकेट, आखूड पल्ल्याच्या बंदूकी, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्त्रे, रडार अनेक अत्याधुनिक उपकरणो संस्थेने विकसीत केली आहेत. या संस्थेच्या 53 प्रगत प्रयोग शाळा आहेत. पाच हजाराहून अधिक शास्त्रज्ञ आणि पंचवीस हजार शास्त्रीय व संबंधित मनुष्यबळ कार्यरत आहे. जगातील इतर प्रगत देशाप्रमाणे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी संरक्षक विषयक प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधनाचे काम करणारी डीआरडीओ ही भारतातील सर्वात मोठी आणि वैविध्यपूर्ण संशोधन संस्था आहे.