शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
2
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
4
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
5
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
6
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
7
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
8
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
9
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
10
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
11
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
12
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
13
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
14
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
15
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
16
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
17
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
18
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
20
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत जनतेने का चुकवावी? - सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 1:13 PM

Abhishek Ghosalkar Murder: अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून राज्याचे राजकारण तापले आहे.

Supriya Sule on Abhishek Ghosalkar: माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अभिषेक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ते शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. हल्लेखोर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. एका लोकप्रतिनिधीची अशी हत्या झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचाच दाखला देत विरोधक सरकारला लक्ष्य करत आहेत. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची सोशल मिडियावर लाईव्ह सुरू असताना गोळीबार करुन हत्या करण्यात आली. नेत्यांवर गोळीबार होण्याची ही महिन्यातील दुसरी वेळ. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या राज्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे 'गुंडाराज' सुरु झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खून पडत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्री महोदयांचे त्यांच्या स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी?

पोलिसांनी मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे. "मॉरिस खूपदा म्हणायचा, मी अभिषेकला सोडणार नाही, मी त्याला संपवणारच. पण मी मॉरिसच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही", असे त्याच्या पत्नीने सांगितले. काही महिन्यांपूर्वीच मॉरिसला बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. तो अनेक महिने तुरुंगात होता. 

दरम्यान, मुंबईच्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीनं त्याच्या कार्यालयात अभिषेक घोसाळकर यांना बोलावले. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करत आता दोघांमधील वाद संपल्याचं सांगितले. मात्र त्याच लाईव्हमध्ये मॉरिसने अभिषेकची गोळ्या मारून हत्या केली. त्यानंतर आरोपी मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या मारून आत्महत्या केली. 

टॅग्स :Abhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळेHome Ministryगृह मंत्रालय