कुणी अवघ्या ३९ हजारांत झाले खासदार; कोणाला ८२ लाखही पुरेना...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:47 AM2019-04-09T11:47:02+5:302019-04-09T11:57:42+5:30

निवडणुक आयोगाने प्रत्यक्ष गोष्टीसाठी, कोणत्या वस्तूसाठी किती रुपये खर्च येणार याची अगदी वडापावपासून ते गाड्यांपर्यंतची यादी तयार केली आहे़ असे असले तरी प्रत्येक उमेदवार त्यातून पळवाटा काढत असल्याचा संशय व्यक्त करण्यास जागा आहे

MPs in only 39 lakhs ; and Whoever no suffices of 82 lakhs ... | कुणी अवघ्या ३९ हजारांत झाले खासदार; कोणाला ८२ लाखही पुरेना...

कुणी अवघ्या ३९ हजारांत झाले खासदार; कोणाला ८२ लाखही पुरेना...

Next
ठळक मुद्दे७० लाखांची खर्च मर्यादा पाळताना धावपळ कागदोपत्री खर्च दाखवताना काढली जाते पळवाट?

- विवेक भुसे
पुणे : निवडणुकीचा खर्च वाढल्याचे सगळेच म्हणतात़ लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी निवडणुक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. प्रत्यक्षात मात्र निवडून आलेल्या खासदारांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या मर्यादेच्या तुलनेत फक्त ५८ टक्के खर्च केल्याचे विवरण निवडणूक आयोगाला सादर केले होते़ त्यामुळे कागदोपत्री दाखवलेला खर्च आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यात तफावत असावी काय, अशी शंका यातून पुढे आली आहे. 
 अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये पाण्यासारखा पैसे खर्च केला जातो़, असे सांगितले जाते. कागदावर मात्र हा खर्च कुठेच दिसत नसल्याचे स्पष्ट होते. निवडणुक आयोगाने प्रत्यक्ष गोष्टीसाठी, कोणत्या वस्तूसाठी किती रुपये खर्च येणार याची अगदी वडापावापासून ते गाड्यांपर्यंतची यादी तयार केली आहे़ असे असले तरी प्रत्येक उमेदवार त्यातून पळवाटा काढत असल्याचा संशय व्यक्त करण्यास जागा आहे. उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार सौम्या गुप्ता यांनी तर सर्वांवर कडी करणारा खर्च सादर केला होता़ त्यांनी केवळ ३९ हजार ३६९ रुपये खर्च केल्याचे दाखविले़ केवळ ३९ हजार रुपयांमध्ये निवडून आल्याचा हा एक विक्रमच असावा़निवडून आलेल्या खासदारांनी दिलेल्या खर्चाच्या विवरणावरुन आसाममधील गौरव गोगोई यांनी सर्वाधिक ८२ लाख ४० हजार रुपये खर्च केल्याचे दाखविले होते़ त्यांच्याकडून ७० लाख रुपयांची मर्यादा ओलांडली गेली होती़ नॅशनल इलेक्शन वॉचने केलेल्या अभ्यासात ही माहिती पुढे आली आहे़ 
 मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मागच्या निवडणुकीला ५ कोटी रुपये खर्च आल्याचे सांगत त्यात आता किती वाढ होईल, हे सांगता येत नसल्याचे विधान करुन खळबळ उडवून दिली होती. दिवसा ढवळ्या वाटेलतसा खर्च होऊ लागला आहे़ हा खर्च कागदावर येणार नाही याची काळजी घेतली जात आहे़ निवडणुक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपये खर्चची मुभा दिला असताना त्याहून कितीतरी पटीने खर्च होत असला तरी तो दाखविला जात नाही़ उमेदवारी अर्ज दाखल करताना काढलेल्या मिरवणुकीसाठी जमलेला समुदाय पाहिल्यावर त्यावरच काही लाख रुपये नक्की खर्च झाल्याचे दिसून येते़ पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक स्टार प्रचारकांच्या सभांसाठी कोटी रुपयांपर्यंत खर्च होत असतात़ या जाहीर सभांसाठी खुर्च्याच ३० ते ४० हजारांवर लावलेल्या असतात़ असे असताना हा खर्च केवळ काही लाख रुपये दाखविला जातो़ 

लोकसभेच्या ५३७ खासदारांनी निवडणुक आयोगाकडे दाखल केलेल्या खर्चाच्या विवरणाचा अभ्यास केल्यावर १७६ खासदारांनी मर्यादेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी खर्च दाखविला होता़
* या खासदारांनी सरासरी केवळ ४० लाख ३३ हजार रुपये खर्च दाखविला़ तो खर्च मर्यादेच्या केवळ ५८ टक्के इतका आहे़ 
* मेघालयातील खासदारांनी सर्वाधिक सरासरी ५७ लाख ८९ हजार रुपये खर्च दाखविला़ त्याखालोखाल केरळ ५२ लाख ९ हजार रुपये त्यांच्या पाठोपाठ सिक्कीमच्या खासदारांनी ५१ लाख ३० हजार रुपये खर्च दाखविला आहे़ 
* मोठ्या राज्यात राजस्थानमधील खासदार खर्च दाखविण्यात सर्वात पुढे होते़ त्यांनी सरासरी ४७ लाख ८९ हजार रुपये खर्च दाखविला़
* महाराष्ट्रातील खासदारांनी सरासरी ४६ लाख ९३ हजार रुपये खर्च दाखविला़ 
* मोठ्या राज्यात आंध्र प्रदेशातील खासदारांनी सरासरी केवळ २९ लाख १९ हजार रुपये खर्च दाखविला आहे़ 
़़़़़़़़़़़़
प्रमुख नेत्यांनी केलेला २०१४ मधील निवडणुक खर्च
नरेंद्र मोदी               - बडोदा                                       ५० लाख ३ हजार ५९८
नरेंद्र मोदी             - वाराणसी                                      ३७ लाख ६२ हजार ३५१
नितीन गडकरी      - नागपूर                                     ४० लाख २६ हजार ७९
राहुल गांधी             - अमेठी                                               ३९ लाख ११ हजार १२३
सोनिया गांधी          - रायबरेली                              ३० लाख ६० हजार १२०
राजनाथ सिंह            लखनौ                                     १७ लाख ७६ हजार ९५२
हेमा मालिनी     -   मथुरा                                         ६३ लाख ३५ हजार २८०
अशोक चव्हाण    -    नांदेड                                      ५५ लाख ४४ हजार ८३१
राजू शेट्टी                      - हातकंणगले                     ५२ लाख ३८ हजार ३०१
विजयसिंह मोहिते पाटील   -  माढा                         ५० लाख ८७ हजार १७७
उदयनराजे भोसले             - सातारा                         ४६ लाख ८० हजार ६०१

Web Title: MPs in only 39 lakhs ; and Whoever no suffices of 82 lakhs ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.