पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससीने) नवीन गुणपद्धती जाहीर केली आहे. एपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता चार चुकीच्या उत्तराबद्दल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मकता गुणांची पद्धत होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. एमपीएससी लागू केलेल्या २००९ च्या नकारात्मकता पद्धती बदल केला आहे. यापूर्वी प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता १/३ एवढे गुण वजा करण्याची पद्धत होती. आता, नवीन नियमानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरामधून २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. वरील नियम लागू करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकांत आली तरीही ती अपूर्णांकांतच राहील. तसेच एखाद्या प्रश्नाचे उत्तली र अनुत्तरित असेल तर, आहे प्रकारची नकारात्मकता गुणांची पद्धत लागू होणार नाही. एमपीएससीने जाहीर केलेली नवीन गुणांची पद्धत सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरिता लागू असणार आहे, अशी घोषणा एमपीएससी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
'एमपीएससी' ने जाहीर केली नवीन गुणपद्धती; विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या काय आहे नेमका बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 3:00 PM