शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा रोहितकुमार राजपूत पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:03 PM

सुधीर पाटील व सोपान टोपे यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत जळगावचा व सध्या पुण्यात राहत असलेला रोहितकुमार राजपूत पहिला आला. मागासवर्गीयांमधून सोलापूर जिल्ह्यातील अजयकुमार नष्टे तर मुलींमधून पुणे जिल्ह्यातील रोहिणी न-हे प्रथम आली. विद्यार्थ्यांना हा निकाल एमपीएससीच्या https://www.mpsc.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल.  उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आदी ३७७ जागांसाठी परीक्षा झाली होती. १ लाख ९८ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ८३९ विद्यार्थी पात्रठरले. त्यातून मुलाखतीसाठी ११९४उमेदवार निवडले गेले. रोहितकुमार ५९९ गुण मिळवून प्रथम तर कोल्हापूरचा सुधीर पाटील ५७२ गुणांसह दुसरा, सोपान टोम्पे ५७१ गुणांसह तिसरा, अजयकुमार नष्टे ५७० गुणांसह खुल्या गटातून चौथा तर मागासवर्गीयांमधून प्रथम, दत्तू शेवाळे ५६६ गुणांसह पाचवा आला आहे. प्रमोद कुडले, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, प्रसेनजीत प्रधान, रोहिणी नºहे, पूजा पाटील, पीयूष चिंचवडे, अमृता साबळे, नूतन खाडे आदी विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.राज्यसेवा परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.ज्या उमेदवारांची निवड झाली नाही, त्यांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास त्यांची गुणपत्रके प्रोफाइलमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावेत अशी सूचना आयोगाकडून करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा हे प्रचंड वैविधता असणारे क्षेत्र आहे. त्यातून समाजासाठी योगदान देता येते. त्यामुळे मी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सर्वसामान्य कुटुंंबात माझा जन्म झाला. माझे आई व वडील दोघेही फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. आई -वडिलांसह माझे मोठे बंधू व वहिनी यांचा मला पाठिंबा मिळाला.- रोहितकुमार राजपूत

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाeducationशैक्षणिकexamपरीक्षा