लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित ‘गट ब’ ची रविवारची परीक्षा देणारे विद्यार्थी सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून निवेदन दिले आहे. दुसरीकडे लोकसेवा आयोगाकडून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्या, त्यावरच परीक्षेला प्रवेश दिला जाईल, अशा सूचनांचे पत्रक काढून परीक्षा रविवार ११ एप्रिलला होणार, यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. एमपीएससीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी मुंबई, पुण्यात अभ्यास करतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे ते आपल्या मूळ गावी परतले आहेत. मिनी लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे केंद्रांवर वेळेत कसे पोहचणार? काहींच्या घरी त्यांचे नातेवाईक पॉझिटिव्ह आल्याने परीक्षा कशी देऊ शकणार? परीक्षा दिली नाही तर काहींची असलेली ही शेवटची संधी असल्याने ती मोजली जाणार का? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. एमपीएससी समन्वय समितीने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षा केंद्रे दूर असल्याने आणि त्याच दिवशी लॉकडाऊन असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. मात्र, योग्य प्रवेशपत्राच्या आधारावर उमेदवारांना प्रवासासाठी सूट मिळणार आहे, असे सरकारच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आल्याने आयोग निर्णयावर ठाम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.६५ टक्के तरुणांना परीक्षा नको११ तारखेची परीक्षा घेतली जावी की नाही, यासंदर्भात विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण घेतले असता १ हजार ९३ तरुणांनी नको (६५%) तर ५९६ (३५%) विद्यार्थ्यांनी परीक्षा व्हावी, असे मत मांडले. काही विद्याथ्यार्ंनी परीक्षा अगदी जवळ आल्याने परीक्षा होऊन जाऊ द्या, असे मत व्यक्त केले.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 2:56 AM