पुणे: चार दिवसंपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा 2021ची जाहीरात जारी केली होती. 290 जागांसाठी ती जाहिरात काढण्यात आली होती. पण, आता आयोगाकडून या जागांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आज आयोगाच्या संकेत स्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राज्यसेवा 2021 च्या जाहिरातीत 100 जागांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(MPSC) विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 290 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त यासह इतर अनेक पद होते. त्यासाठी येत्या 2 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा होणार आहे. तर, याच जाहिरातील सुधार करुन आयोगाकडून नव्याने सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या पदांसाठी होतीय भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 12 उपजजिल्हाधिकारी, 16 पोलीस उपअधीक्षक, 16 सहकार राज्य कर आयुक्त, 15 गटविकास अधिकारी, 15 सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ, 4 उद्योग उप संचालक, 22 सहायक कामगार आयुक्त, 25 उपशिक्षणाधिकारी, 39 कक्ष अधिकारी, 4 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, 17 सहायक गटविकास अधिकारी, 18 सहायक निबंधक सहकारी संस्था ,15 उपअधीक्षक भूमि अभिलेख,1 उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1, सहकारी कामगार अधिकारी 54, उप निबंधक(सहकारी संस्था)10, मुख्याधिकारी नगर पालिका/नगर परिषद गट-अ 15 आणि मुख्याधिकारी नगर पालिका/नगर परिषद गट-ब 75 या पदांसाठी राज्य सेवा परीक्षा 2021 आयोजित करण्यात आली आहे.