राहुल शिंदे -
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ५ लाखांहून २६ लाखांपर्यंत वाढली आहे. मात्र , राज्य शासनाकडून आयोगाच्या कर्मचार्यांच्या संख्येत वाढ करण्याऐवजी घट केले जात आहे. त्यामुळे आयोगाला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी एमपीएससी करून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांना प्रविष्ट होतात. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. २०१०-११ यावर्षी आयोगाकडे परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख ६५ हजार 839 एवढी होती तर ही संख्या २०१८ १९ मध्ये २६ लाख ६४ हजार ४१ एवढी झाली. आयोगाकडे दिवसेंदिवस परीक्षांचा ताण वाढत आहे.अशा परिस्थितीत राज्य शासनाने आयोगाची सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाची ८ व लिपिक टंकलेखक कर्मचारी वर्गाची १६ पदे कमी करण्याचा निर्णय घेतला. आयोगाने शासनाला मनुष्यबळ बाबत निर्माण झालेल्या अडचणी तसेच वस्तुस्थिती सांगितली. मात्र त्यानंतर आहे.शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही. महापरीक्षा पोर्टल सह राजपत्रित गट ब व गट क दर्जाच्या पदांची भरती आयोगामार्फत करता येऊ शकते, याबाबतचा पत्रव्यवहार आयोगातर्फे राज्य शासनाकडे करण्यात आला होता. मात्र, तरीही शासन याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही. त्यामुळे शासनाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग गुंडाळून ठेवायचा आहे का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.-------------------------------------------वर्ष परीक्षेस अर्ज करणारे विद्यार्थी२०१०-११ ५,५६,८३९२०११-१२ ५,६७,५०१२०१२-१३ ८,३४,५७२२०१३-१४ ११,०५,३०५२०१४-१५ ४,५२,४०७२०१५-१६ ५,२९,६९३२०१६-१७ ११,३४,२००२०१७-१८ १७,४१,०६९२०१८-१९ २६,६४,०४१---------------------------------गेल्या दहा वर्षात आयोगाच्या परीक्षा विविध देणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. त्या तुलनेत कर्मचारी संख्या वाढली नाही. आयोगाला पुरेसे मनुष्यबळ दिले तरच ते परिणामकारकपणे काम करू शकते. त्यामुळे आढावा घेऊन आयोगाला पुरेसे मनुष्यबळ द्यायला हवे. - व्ही.एन. मोरे,माजी अध्यक्ष ,एमपीएससी