शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बोईसरमध्ये श्री बालाजी विवाह

By admin | Published: November 19, 2016 3:29 AM

श्री पद्मावती श्री निवास (तिरुपती बालाजी) विवाह सोहळ्यास सुमारे पन्नास हजार भक्तगण उपस्थित राहून बालाजीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतील

बोईसर : शनिवार दि. १९ आयोजित करण्यांत आलेल्या श्री पद्मावती श्री निवास (तिरुपती बालाजी) विवाह सोहळ्यास सुमारे पन्नास हजार भक्तगण उपस्थित राहून बालाजीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने मागील काही दिवसापासुन अहोरात्र जय्यत तयारी सुरु आहे. शनिवार पहाटे साडे पाच वाजता बोईसर नवापूर नाक्यावरील श्री हनुमान मंदिर व श्री नित्यानंत मंदिर येथे सुप्रभातम कार्यक्रम श्रीपद्मावती व श्रीनिवास यांच्या मुर्तीची विधियत पुजा अजचा कार्यक्रम होणार आहे, दुपारी तीन वाजता तारापूर एम्.आय.डी.सी. मधील टीमा सभागृहातून श्रीपद्मावती व श्रीनिवास यांच्या मुर्तिची मिरवणुक काढण्यांत येणार असुन त्या मिरणुकी मध्ये तामिळनाडु, कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील कलावंत पारंपारीक वेशात सुमारे पाच हजार भक्तगण सहभागी होणार आहेत.ही मिरणुक टीमा-नवापूर रोड, बोईसर रेल्वे स्थानक मार्ग कार्यक्रम स्थळी संध्याकाळी सहा वाजता पोहचल्या नंतर मंगल महोत्सव व दर्शन सोहळा संध्याकाळी सहा ते रात्री नऊ च्या दरम्यात होणार असून त्या करीता भव्य दिव्य स्टेज उभारण्यांत आला आहे, महिला व जेष्ठ नागरीक व पुरुष भक्तगण अश्या दोन वेगवेगळ्या लाईन दर्शनासाठी करण्यांत येणार आहेत तर मंगल महोत्सवाच्या पुजे करीता सुमारे पाचशे जोडपी बसणार आहेत. दर्शन घेतल्या नंतर भक्तगणांना महाप्रसादाचे आयोजन करण्यांत येऊन त्यामध्ये तामिळनाडु, आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र अश्या चार राज्यांचे अठरा प्रकार महाप्रसादामध्ये समाविष्ठ केले आहेत. तर महाप्रसाद तयार करण्या करीता सुमारे दोनशे आचार्रीचा वापर होणार आहे, पर्यावरण पूरक अश्या सुपारीच्या पाना पासुन तयार करण्यांत आलेल्या प्लेट महाप्रसादा करीता खास कर्नाकट राज्यातील शिवमुग्गा येथून आणल्या आहेत. (वार्ताहर) >तिरुपतीहून मुर्ती ५० हजार लाडूमहाप्रसादानंतर तिरुपती देवस्थानाहून आणण्यांत आलेल्या पन्नास हजार लाडू प्रसादाचे वाटपाचे नियोजन असून हजारो भक्त गणांना श्रीपद्मावती व श्रीनिवासाची प्रतिमा भेट देण्यांत येणार आहे. तर या मंगल महोसवामध्ये तिरुपती देवस्थानी होण्याऱ्या धार्मिक विधीप्रमाणेच शास्त्रीय मंत्रोच्चारांसह श्री व्यंकटेश्वराची पुजाअर्चा व धार्मिक विधी संपन्न होणार असून सर्व पुजारी हे तिरुपती देवस्थानचे उपस्थित राहणार आहेत. तर श्री पद्मावती व श्रीनिवासाची या दोन्ही मुर्त्या तिरुपती देवस्थानच्या आहेत.पालघर येथे बोईसर उड्डाण पूल मुकूट टैक येथे श्रीकृष्णवरधा, बोईसर रेल्वे स्थानकाबाहेर श्री गणपती तर कार्यक्रम स्थळी ७५ फूट उंचीच्या श्री बालाजी व पद्मावतीच्या प्रतिमा रोषणाई करण्यांत येऊन त्या प्रतिमा चेन्नईतून खास मागविण्यांत आल्या आहेत. रात्रीच्या वेळी या प्रतिमा खूप आकर्षक दिसतात.पालघर तालुक्यांतील साठ गरीब आदिवासी विद्यार्थींनीना सायकलीचे वाटप करण्यात येणार आहेत, विवाह सोहळ्या नंतर फटाक्यांची आतषबाजी होणार आहे बोईसर पोलीसा बरोबर बैठक घेऊन वाहतुकीचे पूर्ण पणे नियोजन करण्यांत आले असून ठीकठीकाणी पार्कींगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यांत आली आहेत तर सर्वत्र सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे दोनशे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यांत आले आहे.