भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिर माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने पाण्याने धुऊन जलाभिषेक घालण्यात आला. मुसळधार पावसासाठी श्री भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव यांनी श्री भुलेश्वरास साकडे घातले. पुरंदर तालुक्यात २००९ पासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत गेले. गेल्या वर्षी तर सर्वांत कमी पाऊस पडला. यामुळे शेती-व्यवसायात मोठ्या प्रमाणात हानी झाली. यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला. यंदा सर्वाधिक पाऊस असल्याचे बोलले जाते; परंतु पुरंदर तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात पावसाने सुरुवात केली नाही. या वेळी अरुण यादव, काकासो यादव, हिरालाल यादव, सदाशिव डोंबाळे, माऊली यादव, प्रकाश यादव पाटील, महादेव यादव, मोहन गद्रे, उद्धव यादव, दादा यादव, राहुल गद्रे, दादा गुरव, राजू गुरव, उमेश गुरव उपस्थित होते.
>मागच्या वर्षी मोठ्याप्रमाणात हुलकावणी दिल्याने दुष्काळाचा मोठा सामना करावा लागला होता. त्यामुळे पाणी टंचाईबरोबर जनावरांच्या चा-याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शेतक-याला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला होता.