मुंबई : महाराष्ट्रातील कुपोषणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर असून, किमान आता तरी मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे म्हणाले, कुपोषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडण्यासाठी राज्य सरकारकडून सरकारी वकिलांना काहीही सूचना नव्हती. या विभागातील भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री उघडपणे संरक्षण देत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाची विचारणा झाल्यानंतरही आपली भूमिका न मांडण्याचा बेडरपणा सवरा यांच्यात आला आहे,अशी टीका त्यांनी केली.
सवरा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - विखे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2016 5:01 AM