शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुबारक बेगम यांचे निधन

By admin | Published: July 19, 2016 6:29 AM

‘कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी’, ‘मुझको अपने गले लगा लो’, या गीतांसह असंख्य गाणी आपल्या समधूर आवाजाने अजरामर करणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम (८०) यांचे मुंबईत रात्री उशीरा निधन झाले.

मुंबई : ‘कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी’, ‘मुझको अपने गले लगा लो’, या गीतांसह असंख्य गाणी आपल्या समधूर आवाजाने अजरामर करणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम (८०) यांचे मुंबईत रात्री उशीरा निधन झाले. १९४९ ते १९७२ या कालावधीत मुबारक बेगम यांनी गायलेल्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मुबारक बेगम यांचे जीवन अतिशय हालअपेष्टांमध्ये गेले. आर्थिक बाबींशी त्यांचा संघर्ष शेवटपर्यंत सुरू होता. सरकारनेही त्यांना वेळोवेळी मदत केली होती. राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील सुजानगडमध्ये मुबारक बेगम यांचा जन्म झाला होता. लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, वाणी जयराम यांच्यासोबत मुबारक बेगम यांनी अनेक गाणी गायली, ती प्रचंड लोकप्रियही ठरली. १९४९मध्ये आईये या चित्रपटात लतादीदींसोबत त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. कैफी आझमी, एस.डी.बर्मन, मोहम्मद रफी, खय्याम, शंकर-जयकिशन या दिग्गजांसोबतही त्यांनी काम केले होते. ‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तनहाईयो में’ आणि १९६५ मधील ‘खूनी खजाना’ या चित्रपटातील ‘ए दिल बता हम कहाँ आ गये’ या गाण्यांनी त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मुबारक बेगम या आयुष्याच्या शेवटच्या काळात पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यानंतर मनेका गांधी यांनी देखील त्यांना मदत करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही त्यांची भेट घेऊन मदत दिली होती. हिंदी आणि उर्दू गाण्यांसोबतच मुबारक बेगम यांनी अत्यंत ताकदीने पंजाबी, मारवाडी आणि गुजराती भाषांमध्येही गाणी गायली होती. १४६ चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे २०० हिंदी गाण्यांना आपला सुमधूर आवाज दिला होता. (प्रतिनिधी)