औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अडीच वर्षांपासून अडकलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या ग्रॅच्युईटीच्या धनादेश वाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. व्याजासह हे धनादेश १८ जून रोजी सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या हाती पडतील. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयामार्फत धनादेशांचे वितरण होईल.एक जानेवारी २००६ नंतर व १ सप्टेंबर २००९ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांना देय असलेली ग्रॅच्युईटीची रक्कम सातऐवजी पाच लाख रु पये क रण्याचा आदेश राज्य सरकारने काढला होता. त्याचा तब्बल १,८८३ प्राध्यापकांना फटका बसला. असोसिएशन आॅफ क ॉलेज अॅण्ड युनिव्हर्सिटी टीचर्सचे अध्यक्ष डॉ. एम.ए. वाहूळ यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यास आव्हान दिले होते. तेथे निकाल विरोधात गेल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले. ३० जानेवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा आदेश रद्द ठरवित असोसिएशनची विनंती मान्य केली व या काळात सेवानिवृत्त प्राध्यापकांना ७ लाख रूपये ग्रॅच्युईटी तीन महिन्यांत देण्याचे आदेश दिले. ही रक्कम औरंगाबाद खंडपीठात जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. (प्रतिनिधी)
ग्रॅच्युईटी धनादेशाला मुहूर्त
By admin | Published: June 17, 2015 3:54 AM