शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

Mucormycosis: भय इथले संपत नाही! कोरोना पाठोपाठ राज्यावर आणखी एक संकट; टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:48 AM

Mucormycosis: कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रावर आणखी एक संकट; आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार

मुंबई/नवी दिल्ली: राज्यात एप्रिलच्या मध्यापासून कठोर निर्बंध लागू असल्यानं कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ३० हजारांच्या आत आला आहे. राज्यात ३१ मेपर्यंत कठोर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी होऊ शकते. मात्र आता राज्यावर आणखी एक संकट आलं आहे. ब्लॅक फंगसमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच शब्द फिरवला; यू टर्नमुळे कोरोना संकट आणखी वाढण्याचा धोकादेशात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे जवळपास ५५०० रुग्ण आढळून आले. ब्लॅक फंगसमुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या लक्षात घेता, त्यापैकी ७० टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. ब्लॅक फंगसचा धोका वाढल्यानं ५ राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. ब्लॅक फंगसमुळे परिस्थिती बिघडत चालली असून या आजारासाठी वापरण्यात येणाऱ्या लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी औषधाची कमतरता भासू लागली आहे.कोरोनाच्या संकटात मोठा निष्काळजीपणा! देशातील 50 टक्के लोक मास्कच वापरत नाहीत; रिसर्चमधून खुलासादेशभरात ५५०० जणांना ब्लॅक फंगस आजार झाला आहे. यातील १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९० जण महाराष्ट्रातील आहेत. ब्लॅक फंगसमुळे हरयाणात १४, तर उत्तर प्रदेशात ८ जणांनी जीव गमावला आहे. उत्तर प्रदेशात ब्लॅक फंगसमुळे प्राण गमावणारे सर्व रुग्ण राजधानी लखनऊमधील आहेत. बिहारमध्ये ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसदेखील आढळून आल्यानं चिंतेत भर पडली आहे.कोणत्या राज्यात काय स्थिती?झारखंडमध्ये ब्लॅक फंगसमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोन जणांचा ब्लॅक फंगसमुळे जीव गेला आहे. बिहार, आसाम, ओदिशा आणि गोव्यात प्रत्येकी एक जण दगावला आहे. काही राज्यांनी अद्याप ब्लॅक फंगसशी संबंधित माहिती गोळा केलेली नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या