सिंगापूर : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी हे सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची मालमत्ता २२.७ अब्ज डॉलर आहे. फोर्बेसने जारी केलेल्या १00 श्रीमंत भारतीयांच्या यादीनुसार, १६.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह सन फार्माचे दिलीप संघवी दुसऱ्या स्थानी आहे. हिंदुजा कुटुंब तिसऱ्या स्थानी फेकले गेले असून त्यांची संपत्ती १५.२ अब्ज डॉलर आहे. १५ अब्ज डॉलरसह अजीम प्रेमजी चौथ्या स्थानावर आहेत. पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांचा या यादीत प्रथमच प्रवेश झाला आहे. २.५ अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह ते ४८ व्या स्थानी आहेत. सर्वांत श्रीमंत १00 भारतीयांची एकूण मालमत्ता ३८१ अब्ज डॉलर (२५.५ लाख कोटी) आहे. २0१५ च्या तुलनेत त्यांची संपत्ती १0 टक्क्यांनी वाढली आहे. २0१५ मध्ये त्यांची संपत्ती ३४५ अब्ज डॉलर होती.
मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2016 4:18 AM