शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

‘अभाविप’च्या वादाची धग मुंबईलाही

By admin | Published: February 28, 2017 2:18 AM

भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात देशभरात सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत.

मुंबई : डाव्या विद्यार्थी संघटना आणि भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात देशभरात सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. अभाविपने शनिवारी मुंबई विद्यापीठात केलेल्या आंदोलनानंतर, स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाने (एसएफआय) सोमवारी दादर येथे निषेधार्थ आंदोलन केले. डाव्या संघटना आणि अभाविप यांच्यात दिल्ली विद्यापीठात सुरू झालेल्या संघर्षाचे लोण देशभर पसरत आहे. पुणे विद्यापीठातील एसएफआयच्या कार्यकर्त्यांना पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली़ एसएफआयचे कार्यकर्ते निषेध मोर्चाचे फलक लावत असताना, ब्लेड, चपलांनी ५ जणांवर हल्ला करण्यात आल्याचे एसएफआयचे मुंबई जिल्हा सचिव रामेश्वर शेरे यांनी सांगितले. कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी एसएफआय, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाने (डीवायएफआय) आणि डाव्या पुरोगामी संघटनांनी आंदोलन केले. सध्याचे सरकार सत्तेत आल्यापासून डाव्या पुरोगामी संघटनांना लक्ष करीत आहेत. राज्यातही झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर अभाविप आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न होत आहे, पण याचा निषेध केला जाईल. सोमवारच्या निषेध मोर्चात विद्यार्थी, तरुण सहभागी झाले होते. या वेळी सरकार आणि अभाविपच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईसह राज्यात याचा निषेध करण्यात येणार आहे. दिल्ली विद्यापीठानंतर आता पुणे विद्यापीठातही मारहाणीचा प्रकार घडला आहे. याचा निषेध केला जाणार, असे शेरे यांनी स्पष्ट केले. दिल्लीत रमजास महाविद्यालयात होत असलेल्या ‘कल्चर्स आॅफ प्रोटेस्ट’ या परिषदेला अभाविपने विरोध केला होता. त्या विरुद्ध प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या मोर्चावर अभाविपने हल्ला केला होता. (प्रतिनिधी)>डावे विरोधात उजव्या विचारसरणीचा वाद मुंबई : दिल्ली आणि पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. केंद्रासह राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनात पार्टी प्रणीत सरकारनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत विद्यार्थी संघटनांकडून डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ले होत असल्याचा आरोप होत आहे. तर केरळमध्ये डाव्यांचे राज्य असून, संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप संघ प्रणीत फोरमने केला आहे.दिल्ली आणि पुण्यातील हाणामारीनंतर राज्यात डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीतील आयसा आणि पुण्यातील एसएफआय या डाव्या विचारसरणीच्या संघटनतेतील विद्यार्थ्यांना अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत एसएफआय, डीवायएफआय यांच्यासह डाव्या पुरोगामी संघटनांनी दादर रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने केली. या निदर्शनांत अभाविप आणि भाजपा सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. केरळमधील राज्य सरकारच्या आशीर्वादाने मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते रा.स्व. संघ आणि भाजपाच्या विरोधात हिंसक कृत्ये करीत असल्याचा आरोप फोरम अगेन्स्ट कम्युनिस्ट टेरर संघटनेने केला आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेत संघटनेने केरळ सरकारवर गंभीर आरोप केले; शिवाय केरळमध्ये सरकारच्या वरदहस्ताने भाजपा आणि संघ स्वयंसेवकांच्या हत्या होत असल्याच्या निषेधार्थ १ मार्च रोजी मुंबईसह देशभरात माकपविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. देशात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून डाव्या पुरोगामी संघटनांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप डीवायएसएफच्या नेत्या प्रीती शेखर यांनी केला आहे. शेखर म्हणाल्या की, विरोधाचा आवाज दडपून त्यांना देशद्रोही ठरवण्याचे काम सुरू आहे. अभाविपसारख्या हल्लेखोरांना अटक करा. पुण्यातील अटक केलेल्या एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर लावलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. लोकशाही मार्गाने संघटना विरोध करत आहे. मात्र अभाविपकडून हल्ले केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल.>नेमका काय आहे वाद?सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एसएफआय आणि अभाविप या विद्यार्थी संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. एसएफआयचे कार्यकर्ते जखमी झाले होते. दिल्लीत आयसा ही डावी संघटना आणि अभाविप यांच्यातही राडा झाला होता. त्याचेच पडसाद आता मुंबईतही उमटले आहेत.