मुंबई : रॉकेट लॉन्चर्स, लांब पल्ल्यापर्यंत शत्रूचा वेध घेणा-या गन आणि तोफा यासह भारतीय सैन्य दलातील (पायदळ) बरीच शस्त्रे पाहण्याची पर्वणी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. सैन्यदलाकडून मंगळवारपासून (दि.१३) तीन दिवस ‘आर्मी डे’ साजरा केला जात असून, यानिमित्ताने गेट वे आॅफ इंडियाजवळ शस्त्रसामुग्रीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.भारतीय सैन्याला स्वातंत्र्योत्तर-पूर्व मोठा इतिहास असून चीन, पाकिस्तानबरोबरच्या युद्धात विजय मिळविला आहे. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरमधील उत्तर पूर्व भागात दहशतवाद्यांविरोधातही लढा देत आहे. यासह एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भविल्यास नागरिकांच्या मदतीसाठी जवान धावत असतात. या कामाची आठवण म्हणून आणि पायदळ सैन्याची ओळख म्हणून दरवर्षी ‘आर्मी डे’ देशभरात साजरा केला जातो. येणार असल्याचे सरंक्षण मंत्रालयातील जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. बोफोर्स तोफा, १0५ एमएम फीड गन, रॉकेट लॉन्चर्स, रडारसह आठ ते दहा सैनिकांना घेऊन जाणारे आणि २५ एमएम गन असणारे वाहन आणि अन्य शस्त्रास्त्रे असतील, असे सांगण्यात आले. १३ आणि १४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लोकांना ही शस्त्रास्त्रे पाहण्यास मिळतील. तर १५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ते पाहण्यास मिळतील. त्यानंतर पायदळ सैनिकांची परेड आणि बॅन्ड पथकाकडून बॅन्डचे सादरीकरण केले जाईल गेट वे आॅफ इंडियाजवळ होणाऱ्या या आर्मी डे निमित्ताने पायदळ सैनिकांकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांची माहिती व्हावी, यासाठी हे प्रदर्शन भरविले आहे.
मुंबईत अवतरणार तोफा, रॉकेट लॉन्चर्स
By admin | Published: January 12, 2015 3:31 AM