शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
2
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...
3
“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका
4
एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट
5
IND vs NZ : बुमराहचा भेदक मारा, टॉम लॅथमच्या पदरी भोपळा; सेटअप करून अशी घेतली विकेट (VIDEO)
6
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
7
Adah Sharma: सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यासाठी अदा शर्माला माराव्या लागल्या कोर्टात चकरा, म्हणाली...
8
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
9
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
10
एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, 'गंदी बात' भोवली! नेमकं प्रकरण काय?
11
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
12
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
13
हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका
14
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
15
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
16
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
17
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
18
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
19
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
20
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक

"यह तो झांकी है... मुंबई महापालिका अभी बाकी है...!", मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे ट्विट! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 9:43 AM

BJP Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने (BJP Mumbai) एक ट्विट करत आपल्या पुढील टार्गेटचे संकेत दिले आहे.  

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यामुळे आता भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. यातच आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने (BJP Mumbai) एक ट्विट करत आपल्या पुढील टार्गेटचे संकेत दिले आहे.  

मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Elections) काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात एकीकडे राजकीय उलथापालथ होत असतानाच सर्वच पक्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील सत्तेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मुंबई भाजपने ट्विट करत म्हटले की, "यह तो झांकी है.... मुंबई महापालिका अभी बाकी है...!". या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता स्थापन होऊ शकते. आज किंवा उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तसेच, भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. 

यंदाच्या निवडणुकीत ९ नगरसेवकांची संख्या वाढणार मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेने ९१ जागा जिंकल्या होत्या तर भाजपाला ८३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु काही वर्षापूर्वी मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ ९७ वर पोहचले. यंदाच्या निवडणुकीत ९ नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ टक्के इतकी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या काळात झालेली होती. त्याआधारे २०२१ पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहित धरून नगरसेवक संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वार्ड पुर्नरचनेत कुणाला फायदा होईल हे निवडणुकीच्या निकालात कळेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाPoliticsराजकारण