शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

मुंबई-चेन्नई काट्याची आज लढत

By admin | Published: May 10, 2014 12:30 AM

मुंबई संघ मायदेशात विजयी वाटेवर आला खरा; मात्र रुळावर आलेली ही गाडी धावत ठेवण्यासाठी शुक्रवारी आयपीएल-७मध्ये चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल.

 मुंबई : यूएईमध्ये सलग पाच पराभवांना सामोरे जाणारा मुंबई संघ मायदेशात विजयी वाटेवर आला खरा; मात्र रुळावर आलेली ही गाडी धावत ठेवण्यासाठी शुक्रवारी आयपीएल-७मध्ये चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल. चेन्नई आठ सामने जिंकून गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर असल्यामुळे चॅम्पियन्स लीग विजेत्या मुंबईला चेन्नईवर विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मुंबईने किंग्ज इलेव्हन पंजाबपाठोपाठ घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर शानदार विजयाची नोंद करताच ‘प्ले आॅफ’च्या दौडीत स्थान कायम ठेवले. पण, पुढील सामन्यात पराभव झाला, तर जेतेपदाच्या शर्यतीतून मुंबई बाद होऊ शकतो. सुपरकिंग्सला मागच्या सामन्यात पंजाबकडून ४४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पंजाबचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि विंडीजचा किरोन पोलार्ड यांना लवकर कसे बाद करायचे, याची चिंता चेन्नईला लागली असावी. वानेखेडेच्या खेळपट्टीवर चेंडू सहजपणे बॅटवर येत असल्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांची चिंता वाढू शकते. मुंबईचे फलंदाज अंबाती रायुडू आणि कोरी अँडरसन, तसेच सलामीचा चिदंबरम गौतम यानेदेखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. उद्या जर रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड, अँडरसन यांना सुरू गवसला तर चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई नक्कीच पहायला मिळणार आहे. चेन्नईने या आधीच्या सामन्यात पराभव केलाच आहे, त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न मुंबई संघ नक्कीच करणार. दुसरीकडे सुपरकिंग्स संघात ब्रेंडन मॅक्यूलम, ड्वेन स्मिथ यांच्याशिवाय सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी हे स्ट्रोक्स खेळण्यात पटाईत असल्याने खेळपट्टीचा लाभ घेतील. गोलंदाजीत उभय संघाचा मारा संतुलित आहे. मुंबईकडून लसिथ मलिंगा याने ९, तर चेन्नईकडून मोहित शर्माने १४ गडी बाद केले आहेत. झहीर खानच्या अनुपस्थितीचा फटका मुंबईला बसेल. त्याची जागा उत्तर प्रदेशचा जलद गोलंदाज प्रवीण कुमार घेईल. मुंबईकडे फिरकीसाठी सहा बळी घेणारा हरभजन, तर चेन्नईकडे ११ बळी घेणारा रवींद्र जडेजा आणि सात गडी बाद करणारा रविचंद्रन आश्विन आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

ड्वेन गतवर्षी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. पण यावर्षी तो चेन्नई सुपरकिंग्जकडून धावांचा पाऊस पाडत आहे. त्याला रोखण्याचे आव्हान मुंबईच्या गोलंदाजां पुढे असणार आहे.

जहिर खानच्या अनुपस्थित गोलंदाजीची मदार मलिंगाकडे असणार आहे. गुरुवारी मुंबई संघाने प्रविण कुमार बरोबर करार केला आहे. या दोघांसह हरभजन सिंहकडे चेन्नईच्या फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.