शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सीईटीत मुंबईच्या मुलांची बाजी

By admin | Published: June 02, 2016 3:17 AM

अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालात मुंबईच्या मुलांनी बाजी मारली आहे.

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या (एमएचटी-सीईटी) बुधवारी लागलेल्या निकालात मुंबईच्या मुलांनी बाजी मारली आहे. पीसीबीमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) २००पैकी २०० गुण मिळवून रिषभ रावत, तर पीसीएममध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) २००पैकी १९९ गुण मिळवून अमन फ्रेमवाला आणि चिन्मय घाणेकर हे दोघेही पहिले आले आहेत.या परीक्षेस राज्यभरातून एकूण ४ लाख ९ हजार २७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तथापि, १ हजार ५४ परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या या परीक्षेला ३ लाख ९८ हजार ०४३ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ लाख ६२ हजार १३३ विद्यार्थी, तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी २ लाख ७५ हजार ६२७ विद्यार्थी बसले होते. त्यातील अभियांत्रिकीसाठी १०० टक्के म्हणजेच सर्वच विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी केवळ १६.९७ टक्के म्हणजेच ४६ हजार ७९७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत वैद्यकीय अभ्यासक्रमातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कारण गेल्यावर्षी ३९ हजार २२८ विद्यार्थी पात्र ठरले होते, त्यात यंदा सुमारे साडेसात हजार विद्यार्थ्यांची भर पडली आहे, अशी माहिती सीईटी कक्षाचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी दिली.........................यंदा दोन चुकीच्या प्रश्नांमुळे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक-एक गुण मिळाल्याने दोन गुणांची कमाई झाली आहे. त्यामुळे यावर्षी सर्वच्या सर्व म्हणजेच ३ लाख ९८ हजार ०४३ विद्यार्थी औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत. कारण पीसीबी किंवा पीसीएममध्ये किमान १ गुण मिळवलेला विद्यार्थीही औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी पात्र ठरत असल्याचे चंद्रशेखर ओक यांनी दिली.-----------------अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांत पहिल्या तीन स्थानांवर मुलांनी झेप घेतली आहे. पीसीबीमध्ये पहिल्या स्थानावर रिषभ रावत, दुसऱ्या स्थानावर आदित्य सबनीस, तर तिसऱ्या स्थानावर मानर्थ चौवाला यांनी सरशी केली. तर पीसीएममध्ये अमन फ्रेमवाला आणि चिन्मय घाणेकर यांनी संयुक्तरित्या प्रथम, तर केशव जनयानी याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.......................प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी चुरस रंगणारराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी मोठी चुरस होणार आहे. कारण शासकीय महाविद्यालयांतील केवळ २ हजार ८१० जागांसाठी एकूण ४६ हजार ७९७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. शिवाय बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बी.पी.टी.एच., बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमांच्या १० हजारांहून अधिक जागांसाठी हे सर्व विद्यार्थी पात्र राहणार आहेत.अभियांत्रिकीच्या गेल्यावर्षी असलेल्या १ लाख ५३ हजार ८६७ जागांमध्ये यावर्षी मोठी कपात झाली आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध असलेल्या केवळ १ लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी २ लाख ६२ हजार १३३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.................................प्रमुख शहरांतील निकाल घसरलाराज्यातील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी केवळ १६.९७ टक्के विद्यार्थी पात्र ठरले. यात सर्वाधिक मराठवाड्यातून २१.६१ टक्के, त्याखालोखाल विदर्भातून २०.९१ टक्के आणि उर्वरित महाराष्ट्राचा निकाल केवळ १३.९९ टक्के लागला आहे....................अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमातील टॉपर्सची नावेअभियांत्रिकी अभ्यासक्रमविद्यार्थी, महाविद्यालयाचे नावमिळालेले गुण २०० पैकी१. अमन फ्रेमवाला, जयहिंद महाविद्यालय, मुंबई१९९२. चिन्मय घाणेकर, साठ्ये महाविद्यालय, मुंबई१९९३. केशव जनयानी, पीपल्स एज्युकेशन कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे१९७४. सिद्धेश गांधी, पीएमसी राजीव गांधी अ‍ॅकॅडमी आॅफ इ लर्निंग कनिष्ठ महाविद्यालय, पुणे १९७५. अमित शिंदे, प्रताप कॉलेज, अमळनेर १९७६. रोहित जेठानी, पेस कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे १९६७. कार्तिक सुरेश, सेंट झेवियर्स कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई१९६८. आदित्य थोरात, केबीपी महाविद्यालय, ठाणे १९६९. जैनम शहा, जयहिंद महाविद्यालय, मुंबई१९५१०. तुषार खांडोर, रॉयल कॉलेज आॅफ आर्ट्स सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, भार्इंदर १९५वैद्यकीय अभ्यासक्रमविद्यार्थी, महाविद्यालयाचे नावमिळालेले गुण २०० पैकी१. रिषभ रावत, आयईएस एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई२००२. आदित्य सबनीस, साठ्ये महाविद्यालय, मुंबई१९९३. मानर्थ चौवाला, आयईएस एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई१९९४. सृष्टी पाटील, आर्मी पब्लिक स्कूल, पुणे१९९५. अर्शिया चौधरी, ए.डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालय, पुणे१९९६. स्वप्निल भगत, ब्लू वेल्स कनिष्ठ महाविद्यालय, नांदेड १९९७. ध्रुव शेट्टी, आयईएस एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई१९८८. रौनक पोपट, अल्फा कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य१९८९. वैभव जगताप, खामगाव कनिष्ठ महाविद्यालय१९८१०. प्रतीक जोशी, अर्णव कनिष्ठ महाविद्यालय, वैराग१९८