शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई नापास

By admin | Published: May 05, 2017 6:46 AM

केंद्र सरकारच्या स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई महापालिका नापास झाली आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयामार्फत नुकत्याच झालेल्या

मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई महापालिका नापास झाली आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयामार्फत नुकत्याच झालेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मुंबई २९व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई शहराने मुंबईला मागे टाकत आठवा क्रमांक पटकावला आहे. तर स्वच्छतेच्या मोहिमेत अशी पीछेहाट झाल्याने मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा दावा करणारे महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत, महापालिकेने स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम सुरू केले. स्वच्छतेच्या अजेंड्यावर मुंबई हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले. या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियानेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईचा दौरा केला. त्यावेळीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने स्वच्छतेचे दर्शन या पथकाला घडवले. ही स्वच्छता कायम ठेवण्यासाठी विभागात नियमित फेरफटका मारून स्वच्छतेची खातरजमा करण्याची ताकीदही प्रशासनाने सर्व सहायक आयुक्तांना दिली होती. तसेच स्वच्छतेचा दूत म्हणून प्रसिद्ध अभिनेता सलमान खानलाही या मोहिमेत उतरवण्यात आले. काही दिवसांतच मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे महापालिका प्रशासन घाईघाईने जाहीर करून मोकळे झाले. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांचा अभाव असल्याने आजही मुंबईत काही भागांमध्ये उघड्यावर प्रात:विधी उरकणारे दिसून येत आहेत. त्याचबरोबर ओला व सुका कचरा मोहिमेकडे नागरिकांनी फिरवलेली पाठ, कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची मंदगती, देवनार कचराभूमीवर सतत लागणाऱ्या आगी आणि नालेसफाई मोहिमेचे तीन-तेरा यामुळे स्वच्छतेत महापालिकेची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर असलेले मुंबई शहर २९व्या क्रमांकावर पोहोचले आहे. त्याचवेळी मुंबईच्या तुलनेत छोटेसे शहर असलेले नवी मुंबई गतवर्षीच्या १२व्या क्रमांकावरून थेट आठव्या क्रमांकावर पोहोचले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेने मुंबई शहराचा जागतिक दर्जा टिकवण्यासाठी स्वच्छता मोहिमेवर भर दिला आहे. यासाठी स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूदही वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रयोग फेल जात असल्याने मुंबईची कचराकुंडी झाली आहे. या मोहिमांमध्ये नागरी सहभाग मिळवण्यातही पालिकेच्या पदरात अपयशच पडले आहे. परिणामी, केंद्राच्या परीक्षेत मुंबई महापालिकेची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक गुण जास्तच असल्याने यास महापालिकेची पीछेहाट म्हणता येणार नाही, असे हास्यास्पद स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे. त्याही पुढे जात मोठ्या शहरांमध्ये मुंबईच अव्वल असल्याचा दावा पालिकेने केला आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत १५३४ गुण मिळवणाऱ्या महापालिकेने प्रगती करीत १५३५ गुण मिळवले असल्याचे जाहीर करीत, आपली पाठही पालिकेने थोपटून घेतली. त्याहून कहर करीत नागरिकांनी प्रतिसाद कमी दिल्याने हा क्रमांक घसरला, असा दावा प्रशासनाने केला आहे. आॅनलाइन प्रतिसादावरही पालिकेने नाराजी व्यक्त करीत नागरिकांनाच एकप्रकारे दोषी ठरवले आहे. मोबाइल शौचालय, सार्वजनिक शौचालयात स्वच्छता, बेकायदा  होर्डिंग काढणे, रात्रीची सफाई असे प्रयत्न वर्षभर करूनही पाच हजार नागरिकांनी या सर्वेक्षणात आपले मत नोंदवले. यात आॅनलाइनचा सहभाग केवळ पाचशे मतांचा होता, अशी सारवासारवही प्रशासन करीत आहे. (प्रतिनिधी)कचरा टाकण्यासाठी जागेचा अभावमुंबईत दररोज साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो. मात्र, ‘बेस्ट आउट आॅफ वेस्ट’चे महापालिकेचे प्रयत्न फेल गेल्याने कचराभूमींवर आज कचऱ्याचे डोंगर आहेत. कचराभूमीवरील हा भार कमी करण्यातही महापालिका अपयशी ठरली आहे. सद्यस्थितीत देवनार व मुलुंड कचराभूमीला टाळे लावण्याची वेळ आली आहे.  त्यात देवनार कचराभूमीवरील सततच्या  आगीने स्थानिकांचे आरोग्य बिघडले आहे. तळोजा येथील जागा कचराभूमीसाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होणे हीच यातील जमेची बाजू आहे.शौचालयांचा अभाव स्वच्छ भारत अभियानच्या नियमानुसार प्रत्येक ३०  जणांमागे एक शौचकूप असावे. मुंबईत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ६३ टक्के लोकांसाठी एक लाख ६३ हजार शौचकूप असणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबईत ६० हजार शौचकूप कमी आहेत.हागणदारीमुक्त मुंबई जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात आजही अनेक ठिकाणी झोपडपट्टीतील रहिवाशांना शौचालयाअभावी उघड्यावर जावे लागते. हे चित्र बदलण्याचा विडा महापालिकेने उचलला. अभिनेता सलमान खान या मोहिमेचा दूत बनला.मात्र, त्याचे वडील व प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी वांद्रे येथील त्यांच्या घरासमोरील शौचालयास विरोध केला आहे.हागणदारीमुक्त मुंबई ही मोहीम यशस्वी झाल्याचे महापालिकेने राज्य सरकारच्या नगर विकास खात्याला लगबगीने कळविलेही. शहनिशा करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला स्वच्छ ठिकाण दाखविण्याची अधिकाऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र, राज्य सरकारने या मोहिमेचे खरे रूप केंद्रासमोर मांडल्याचे समजते.कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्प कचरा टाकण्यासाठी जागा मिळत नसल्याने काळाची गरज म्हणून कचरा पुनर्प्र्रक्रिया प्रकल्प पालिकेने हाती घेतला. त्यानुसार देवनारमध्ये चार हजार आणि कांजुरमार्गमध्ये दोन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार होती. मात्र, या प्रकल्पाने आघाडी घेतलेली नाही. विभागस्तरावर कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा प्रकल्पही थंडावलाच. त्यामुळे कचऱ्याचा ढीग व मुंबईवर कचऱ्याचा भार वाढतच गेला.ओला व सुका कचरा एकत्रच कचराभूमीवर वर्षोनुवर्षे जात आहे. त्यामुळे सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करून त्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहीम २००६मध्ये आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना, लोक प्रबोधन, दंडात्मक कारवाई असे सर्व प्रयोग झाले. मात्र, ओला व सुका कचऱ्यासाठी कचऱ्याचे स्वतंत्र डबे, नाक्यानाक्यांवर बसविण्यात पालिकेला अपयश आले.