मुंबई ढगाळ!मुंबई : मोसमी वार्यांनी अंदमानला चाहूल दिली असतानाच पुढील चोविस तासांसाठी मुंबई शहरात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्र विभागाने वर्तवला आहे.विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनास दक्षिण अंदमान समुद्रात व दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात पूरक स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. तसेच संपुर्ण राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई शहरातील कमाल तापमानातही आता घट नोंदविण्यात येऊ लागली आहे. ३६ अशांवर पोहचलेले कमाल तापमान ३३ अंशावर आले असून, वातावरणातील ऊकाडाही कमी झाले आहे. परिणामी मुंबईकरांनी काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)....................
मुंबई ढगाळ!
By admin | Published: May 14, 2014 10:01 PM