शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

महाबळेश्वरएवढीच मुंबई थंड

By admin | Published: December 27, 2016 1:19 AM

कायम घामांच्या धारांनी त्रस्त असलेल्या मुंबईकरांना सोमवारी महाबळेश्वरच्या वातावरणाचा फिल आला. निमित्त होते ते घसरलेल्या किमान तापमानाचे. महाबळेश्वर आणि मुंबईचे

मुंबई : कायम घामांच्या धारांनी त्रस्त असलेल्या मुंबईकरांना सोमवारी महाबळेश्वरच्या वातावरणाचा फिल आला. निमित्त होते ते घसरलेल्या किमान तापमानाचे. महाबळेश्वर आणि मुंबईचे किमान तापमान सोमवारी समान नोंदवण्यात आले. महाबळेश्वरचे किमान तापमान १५ तर मुंबईचे किमान तापमान १५.९ अंश नोंदवण्यात आले असून, घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकर चांगलेच गारठले आहेत. तर मंगळवारसह बुधवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंशावर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी मुंबईत पडलेली थंडी आणखी काही दिवस कायम राहणार असून, येथे पडलेल्या गारव्याने मुंबई चांगलीच सुखावली आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीसह उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा हा परिणाम आहे. उत्तर भारतातील शीत वारे दक्षिणेकडे वाहत आहेत. परिणामी मुंबईसह राज्यातील किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे ९.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तत्पूर्वी रविवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदवण्यात आले होते. सोमवारी किमान तापमानात एक अंशाची घसरण झाली असून, शहरात पडलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे मुंबई गारठली आहे. दरम्यान, गोव्यासह संपुर्ण राज्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तर उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. मुंबई शहराऐवजी पूर्व आणि पश्चिम उपनगरात वाहणाऱ्या गार वाऱ्याचा वेग अधिक आहे. या कारणात्सव शहराच्या तुलनेत उपनगरातील वातावरण अधिक थंड असून, किमान तापमान खाली घसरल्याने ऊकाड्याने हैराण असणारे मुंबईकर सध्या तरी थंडीमुळे सुखावले आहे. (प्रतिनिधी)राज्यातील शहरांचे किमान तापमाननाशिक-९.६जळगाव-९.७पुणे-१०.९औरंगाबाद-१०गोंदिया-१०मालेगाव-११अकोला-११.५नागपूर-११.७सोलापूर-१२.७परभणी-१२अमरावती-१२.८चंद्रपूर-१२.६यवतमाळ-१२.४सातारा-१३नांदेड-१३वर्धा-१३कोल्हापूर-१४.८महाबळेश्वर-१५बीड-१५(अंश सेल्सिअसमध्ये)