शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

मुंबई-दिघी-दाभोळ सागरी प्रवासी वाहतूक सुरू, भाऊचा धक्का ते दिघी साडेचार तासांत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:10 AM

मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून

अलिबाग : मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून, कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. बुधवारी दिघीपर्यंत आलेली ही बोट गुरुवारी भाऊचा धक्का (मुंबई) - दिघी(रायगड) आणि पुढे रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळपर्यंत प्रवासी सेवा देणार असून, परतीचा प्रवासदेखील दाभोळ-दिघी-भाऊचा धक्का असा असेल, अशी माहिती मेरिटाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.मेरिटाइम बोर्डाने डेल्टा मेरिटाइम अँड इंडस्ट्रियल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांना एमव्ही रावी आणि एमव्ही शिवम या दोन बोटी आणि विंध्यवासिनी मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या एमव्ही केपीएस या बोटीला मुंबई ते दिघी, दिघी ते दाभोळ आणि दाभोळहून दिघीमार्गे मुंबई या मार्गावर चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. या बोटसेवेचे वेळापत्रक बोर्डाच्या ँ३३स्र२://ेंँेंु.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइटवर देण्यात आले आहे. मुंबई ते दिघी या प्रवासासाठी प्रति प्रवासी ३३० रु. आणि मुंबई ते दाभोळसाठी प्रति प्रवासी ६६० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्वकल्पना नसल्याने पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. बुधवारी दोन प्रवाशांनी धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) या सागरी प्रवासी सेवेचा लाभ घेतला. गुरुवारपासून प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी माहिती दिघी बंदराचे अधीक्षक अरविंद सोनावणे यांनी दिली.बुधवारी केपीएएस ही बोट सकाळी ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दुपारी दीड वाजता दिघीला पोहोचली.बोट फेºयांचे वेळापत्रकगुरु वार १९ आॅक्टोबर रोजी शिवम ही बोट स. ८ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. १२.३० वाजता दिघीला पोहोचेल. रावी ही बोट स. ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. दीड वाजता दिघीला पोहोचेल, तर दिघीहून दु. २.३० वाजता निघून सायंकाळी ७ वाजता मुंबईला पोहोचेल. केपीएस ही बोट स. साडेदहा वाजता भाऊचा धक्काहून निघून दु. ३ वाजता दिघीला पोहोचेल, तर दु. ४ वा. दिघीहून निघून रा. ८.३० वा. मुंबईला पोहोचेल.शुक्र वारी २० आॅक्टोबर रोजी एमव्ही रावी बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ८ ते दु. १२.३० व दिघी-मुंबईसाठी दु. १.३० ते सायं. ६, केपीएस बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ९.३० ते दु. २ व दिघी-मुंबईसाठी दु. ३ ते सायं. ७.३० असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई