शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

मुंबई - डॉ. आंबेडकर मार्गावर अजस्त्र खड्डे

By admin | Published: July 20, 2016 9:05 PM

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रस्ते विभागामधील ३४ रस्त्यांच्या घोटाळ््याप्रकरणी महापालिका अभियंत्यांसह कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाले.

-  चेतन ननावरे

मुंबई, दि.20 -  मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रस्ते विभागामधील ३४ रस्त्यांच्या घोटाळ््याप्रकरणी महापालिका अभियंत्यांसह कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाले. मात्र लालफितीच्या कारवाईत भ्रष्टाचार झालेल्या रस्त्यांची डागडुजी रखडली आहे. परिणामी लोकांना या खड्ड्यांचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.ई वॉर्डमधील या मार्गाची पाहणी ह्यलोकमतह्णने केली. त्यावेळी रस्त्यावर सहा ते सात फूट लांबीचे व रूंदीचे खड्डे असल्याचे निदर्शनास आले. आजघडीला संपूर्ण ई वॉर्डमध्ये सुमारे ५० खड्डे असल्याचा महापालिकेचा दावा आहे.याउलट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर २५हून अधिक खड्डे असल्याचे दिसले. यावरून महापालिकेचा दावा किती फोल आहे, याचा प्रत्यय येतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील खड्ड्यांबाबत लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक नगरसेवकांना विचारणा केली असता, त्यांनी हा मार्ग रस्ते विभागांतर्गत येत असल्याची माहिती दिली. यावर हा रस्ता येत्या वर्षभरात नव्याने बांधणार असल्याचे रस्ते विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय तात्पुरती डागडुजी म्हणून याठिकाणी पडलेले खड्डे तत्काळबुजवण्याचे काम प्रशासन करत असल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.डांबर, सिमेंट आणि पेव्हर ब्लॉक...या मार्गावरील वेगवेगळ््या ठिकाणचे खड्डे बुजवताना एकाच पॅचवर सिमेंट, डांबर आणि पेव्हर ब्लॉकचा वापर केल्याचे दिसले. काहीच काळात तात्पुरत्या स्वरूपात बुजवलेले येथील खड्डे पुन्हा डोके वर काढत आहेत. त्याचा त्रास वाहतूक कोंडीच्या रुपात वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांनाही होत आहे.गेला पैसा कुणीकडे?भायखळ््यापासून सुरू होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग पुढे लालबाग, करीरोड, परळ, दादरमार्गे किंग्ज सर्कलला जोडला जातो. हा लांब रस्ता दोन टप्प्यांत बांधण्यासाठी आर.के.मदानी या कंत्राटदाराच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात ३ कोटी ९३ लाख रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी ८७ लाख रुपये एवढी रक्कम खर्च केली.मात्र भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आलेल्या ३४ रस्त्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील भायखळा हद्दीतील मार्गाचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेले आहे, असे बोलणे वावगे ठरणार नाही.

खात्यांतर्गत चौकशीशिवाय कारवाई नकोमुंबई महानगरपालिका अभियंत्यांच्या कृती समितीने बुधवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. महापालिकेतील रस्ते भ्रष्टाचार प्रकरणी खात्यांतर्गत चौकशी झाल्याशिवाय अभियंत्यांवर कारवाई नको, अशी मागणी महापालिकाआयुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी, असे आवाहन कृती समितीने केले आहे. रस्ते प्रकरणात जनरल कंडिशन्स आॅफ कॉन्ट्रॅक्ट मधील कलम क्रमांक ६९ व ८७ च्या तरतुदीनुसार संबंधित अभियंता कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम परत घेऊ शकतो, असे कृती समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकचे अधिदानझालेली रक्कम वसूल होऊ शकते. परिणामी निलंबीत केलेल्या दोनही कार्यकारी अभियंत्यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर घेण्याची मागणी कृती समितीने केली आहे.

रस्ते विभागाकडे पाठपुरावा...डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हा रस्ते विभागांतर्गत येतो. त्यामुळे त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम रस्ते विभागाचे आहे. माझ्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. तरीही आंबेडकर मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रस्ते विभागाकडे पाठपुरावा करत आहे.- रमाकांत रहाटे, स्थानिक नगरसेवकविधानसभेत प्रश्न उपस्थित केले...यासंदर्भात विधानसभेत वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचा परवाना रद्द करण्याची गरज आहे. सध्या तरी वॉर्ड स्तरावरही पाठपुरावा करत असून लोकांना त्रास होऊ नये, म्हणून तत्काळ येथील खड्डे बुजवण्याची मागणी पालिकेकडे केली आहे.- (वारिस पठाण, स्थानिक आमदार)

मुंबईतील खड्ड्यांमुळे वाहन चालवताना खूप त्रास होतोय. बोरीवलीहून पाऊणतासात भायखळ््याला येण्याऐवजी पावणे दोन तास लागले. त्यामुळे महापालिकेला विनंती आहे की खड्डेप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढा.वेळेसोबत कमरेचाही त्रास होत आहे. कार चालकांहून दुचाकीवर कुटुंबियांसोबत प्रवास करणाऱ्यांची अधिक काळजी वाटते. आत्ता अती झाले आहे, त्यामुळे लोक रस्त्यावर येण्याआधी या प्रश्नाची दखल घ्यावी. लोकांचा रोष ओढावणार नाही,असे काम महापालिकेने करायला हवे.- हेमांगी कवी, अभिनेत्री