शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

मुंबईला मिळणार ‘सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी’

By admin | Published: April 10, 2017 6:41 AM

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेले मेट्रो-२, मेट्रो-२ ब, मेट्रो-४, मेट्रो-६ आणि मेट्रो-७ अ हे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेले मेट्रो-२, मेट्रो-२ ब, मेट्रो-४, मेट्रो-६ आणि मेट्रो-७ अ हे मेट्रो प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांची कनेक्टिव्हिटी वाढवणार आहेत. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. एमएमआरडीएचे मेट्रो प्रकल्प मार्गी लागण्यास अवकाश असला, तरी भुयारी मेट्रो-३ हीदेखील या मार्गांना जोडणार आहे. मुंबई शहरदेखील पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, केवळ पूर्व आणि पश्चिम उपनगर नाही, तर ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेशाची कनेक्टिव्हिटी मेट्रोसारख्या वाहतूक प्रकल्पांमुळे वाढण्यास मदत होणार आहे. यातील बहुतांश प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगर जोडण्यावर भर देत आहेत. एकंदर प्राधिकरणाने या प्रकल्पांसाठी केलेली तरतूद पाहता, भविष्यात या प्रकल्पांमुळे उपनगर ‘सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी’कडे वाटचाल करणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुलाच्या विकासाकरिता ७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे संकुलात अधिक पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहेत. संकुलामध्ये नेहमी येणाऱ्या-जाणाऱ्यांबरोबरच क्वचित भेट देणाऱ्यांकरिता विद्युत/हायब्रीड बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, वांद्रे-कुर्ला संकुलाचे रूपांतर ‘स्मार्ट सिटी’मध्ये करण्याकरिता ही दीर्घकालीन तरतूद करण्यात आली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पुलापर्यंत उन्नत मार्ग बांधण्याकरिता ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून, पाच किलोमीटर लांबीच्या उन्नत वाकोला-कुर्ला मार्गामुळे वांद्रे-कुर्ला संकुलास उत्तम जोडणी उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे, येथील वाहतूककोंडीची समस्या कमी होईल. (प्रतिनिधी)पहिला मेट्रो मार्गमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा पहिला मेट्रो मार्ग उभारला. या मेट्रोला झालेल्या विलंबामुळे प्राधिकरणावर कठोर टीका झाली. मेट्रोच्या उद्घाटनापासून मेट्रोच्या कामकाजामुळे ही मेट्रो सुरुवातीपासून वादात सापडली. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर मेट्रो धावू लागली, तेव्हा मात्र प्रवाशांनी या मार्गाला तुफान प्रतिसाद दिला.छेडानगर फ्लायओव्हर ठरणार उपयुक्तपूर्व उपनगराचा विचार करता, छेडानगर येथे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडपासून आणि पूर्व द्रुतगती महामार्गापासून येणारी वाहने एकाच ठिकाणी येतात. परिणामी, वाहतूककोंडीत भर पडते. वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी दोन फ्लायओव्हर आणि एक उन्नत रस्ता बांधण्याकरिता २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा ८० मीटर लांब आणि तीन मार्गिका असणारा फ्लायओव्हर, सध्या अस्तित्वात असणाऱ्या तीन मार्गिकेच्या फ्लायओव्हरशी संमातर असून, तो सायन ते ठाण्याच्या दिशेने जाईल. तर १ हजार २४० मीटर लांब आणि दोन मार्गिकांचा असणारा दुसरा फ्लायओव्हर हा छेडानगर येथे अस्तित्वात असलेल्या फ्लायओव्हरवरून जाईल. नवी मुंबईपासून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीला या फ्लायओव्हरचा वापर करणे शक्य होईल. शिवाय, ६५० मीटर लांब आणि दोन मार्गिका असणारा उन्नत रस्ता छेडानगर येथील सध्याच्या फ्लायओव्हरला अमर महल जंक्शन फ्लायओव्हरशी जोडला जाणार आहे.याचा खर्च २४९ कोटी एवढा आहे.मेट्रो-९दहिसर पूर्व ते मीरा-भार्इंदर या मेट्रो-९ या मेट्रो मार्गालाही मान्यता मिळाली आहे. या मेट्रो मार्गात १० स्थानके असणार आहेत. या प्रकल्पाकरिता आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनासाठी होणारा खर्च ६ हजार ५१८ कोटी एवढा आहे.मेट्रो-२दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा मेट्रो-२ मार्ग पश्चिम आणि पूर्व उपनगराला जोडणार आहे. या मार्गामुळे पश्चिम उपनगरातील दहिसरपासून हार्बरवरील मानखुर्द गाठणे सहज शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मार्गात वांद्रे कनेक्ट असल्याने प्रवाशांची पायपीट वाचणार आहे.मेट्रो-२ ब : डी. एन. नगर-मंडाळे हा मेट्रो-२ ब प्रकल्पही पश्चिम आणि पूर्व उपनगराची कनेक्टिव्हिटी वाढवणार असून, या प्रकल्पाची किंमत दोनशे कोटी आहे.मेट्रो-४वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली हा मेट्रो-४ मार्ग संपूर्णत: पूर्व उपनगराची कनेक्टिविटी वाढवणार आहे. या मार्गामुळे ठाणे दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे हार्बर पूर्व उपनगराशी जोडले जाणार आहे. ही कनेक्टिविटी पूर्व उपनगराला दिलासा देणार आहे.मेट्रो-६कांजूरमार्ग समर्थनगर-जेव्हीएलआर-सिप्झ-कांजूरमार्ग-विक्रोळी हा मेट्रो-६ मार्ग पूर्व उपनगराला दिलासा देणार आहे. या मार्गामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगर जोडले जाईल.मेट्रो-७ अअंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा मेट्रो-७ अ हा प्रकल्प पश्चिम उपनगराची कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. या मेट्रो मार्गामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी कमी होईल, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.