शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा

By admin | Published: July 11, 2017 3:29 AM

पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे.

वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे. पनवेल ते पेणपर्यंत सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत. खड्डे व रुंदीकरणाच्या कामामुळे वारंवार वाहतूककोंडी होत असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी अत्यावश्यक कामे केली नाही तर गणेशभक्तांना गावी पोहचणे अशक्य होणार आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या चार राज्यांमधून जाणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम शासनाने सुरू केले आहे. १२६९ किलोमीटर एवढे अंतर असून महाराष्ट्रात ४८२ किलोमीटरचा समावेश आहे. राज्यातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी तब्बल ११ हजार ७४७ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात पनवेल ते इंदापूरपर्यंत ८४ किलोमीटरच्या रोडचे रुंदीकरण प्रत्यक्ष सुरू झाले आहे. रुंदीकरणासाठी कर्नाळा अभयारण्यातील जवळपास १.६५ हेक्टर वनजमिनीवरील वृक्षही तोडण्यात आले आहेत. कोकणच्या विकासाचा राजमार्ग म्हणून या रोडचे वर्णन केले जात आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये सद्यस्थितीमध्ये हा रस्ता कोकणवासीयांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. पनवेल ते पेणपर्यंतची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रुंदीकरणासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे रोड अरुंद झाला असून सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होत आहे. रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसून वाहने त्यामध्ये अक्षरश: आदळत आहेत. खड्ड्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. रोडवर अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आवश्यक सूचना फलक लिहिण्यात आलेले नाहीत. परावर्तक पट्ट्या, बोर्ड व इतर उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. महामार्गाला लागून असलेल्या गावांनाही याचा मोठा फटका बसला आहे. चिंचवण, पळस्पे, कल्हे व इतर अनेक गावांमधील नागरिकांना ये -जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी सूचना फलक दिले आहेत, परंतु प्रत्यक्षात जिथे खोदकाम केले आहे त्या सर्व ठिकाणी अत्यावश्यक बोर्र्ड लावणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना काम सुरू असल्याचे कळावे यासाठी परावर्तक पट्ट्याही असणे आवश्यक आहे. पण याविषयी योग्य खबरदारी घेण्यात आलेली नाही. यामुळे सद्यस्थितीमध्ये सकाळी व सायंकाळी वाहनांची संख्या वाढल्यानंतर वाहतूककोंडी होत आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यापूर्वी खड्डे दुरुस्त केले नाहीत व अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे केली नाही तर गणेशभक्तांना मोठा फटका बसणार आहे. >वाहन चालकांची कसोटीमुंबई-गोवा रोडवर वाहन चालविणाऱ्या चालकांना अपघात टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. जाणारी व येणारी वाहतूक एकाच रोडवरून सुरू आहे. रोड अरुंद असून त्यावरही खड्डे पडले आहेत. वाहतूककोंडी झाली की एकाच ठिकाणी अडकून राहावे लागत आहे. महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे शिक्षा असल्याची प्रतिक्रिया चालक व प्रवासीही व्यक्त करत आहेत. >महामार्गावरील प्रस्तावित सर्व्हिस रोडपळस्पे, चिंचवण, तारा, जिते, पेणमध्ये ३, उचिवडे, वडखळ, गडब, कासू, पंडापूर, पटनी, निगडे, कोलेती, नागोठणे, खांब, कोलाड, तळवली>वाहनांसाठी भुयारी मार्गचिंचवण, खोपोली जंक्शन, पेण, वडखळ बायपास, नागोठणे, कोलाडमहत्त्वाचे यू टर्नतुरमळे, चिंचवण, कर्नाळा किल्ला, कल्हे, आपटा फाटा, आंबिवली, वीरवाडी, खोपोली, वाशी, वडखळ, इस्पात फॅक्टरी, जुई, अक्कादेवी मंदिर, आमटे, खटाळे, निदी, नागोठणे, पाली, अलिबाग, सुकेली, पुगाव, कोलाड, घोटवले, वावेदीवाडी, गांगेवाडी, नागरोलीपादचारी भुयारी मार्गपळस्पे, तारा, जिते, पेण, उचिडे, गडब, कासू, निगाडे, कोलेती, नागोठणे, खांब, तळवली, रातवडमुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेतले जाणार आहे. गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील सर्व खड्डे दुरुस्त केले जातील. आम्ही महामार्गाची पाहणी करत असून आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. - हेमंत फेगडे, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण>महामार्गावरील प्रमुख समस्या पनवेल ते पेणपर्यंत रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेतरुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या बहुतांश ठिकाणी सूचना फलक नाहीतकाम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक परावर्तक पट्ट्या नाहीतकाम कधी सुरू झाले, कधी संपणार याविषयीचा तक्ता कुठेच लावलेला नाहीमहामार्गावर ठेकेदाराकडून रुग्णवाहिका, रुग्णालय यांच्याविषयी फलक लावलेले नाहीतअपघात झाल्यास अत्यावश्यक संपर्क क्रमांकाचे फलकही लावलेले नाहीतरोडलगतच्या नाल्यांमध्ये माती साचली असून वाहने अडकण्याची भीती