ऑनलाइन लोकमत
खेड, दि. २२ : मुसळधार पावसाचे पाणी भरणे नाका येथील पुलावरून वाहू लगल्यामुळे मुंबई-गोवा महमार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबईकडून येणाऱ्या गाड्या खेड मध्ये तर मुंबईकड़े जाणाऱ्या गाड्या चिपळूणमध्ये थांबवण्यात आल्या आहेत. दरम्यान या अतिवृष्टीत एकाच बळी गेला आहे.
मुसळधार पावसामुळे खेड मधे पाणीच पाणी झाले आहे. नारिंगी नदीला पूर आला आहे. त्यामुळे खेड दापोली मार्ग बंद झाला आहे. चोरद नदीला आलेल्या पुरामुळे 42 गावांचा संपर्क तुटला आहे. पोलिस व प्रशासनाचे कर्मचारी किनाऱ्यावरील गावांकडे लक्ष ठेवून आहेत.
बिजघर गावातील नदीत गावातील इसम वाहुन गेला. मात्र त्याबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. सावित्री पुलावरील दुर्घटना डोळ्यासमोर ठेवून पोलीस व प्रशासनाने महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खेड पोलिसानी चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेस व इतर वाहने भरणे नाका येथे डवल्या. तर चिपळूण पोलिसांनी चिपळूण येथे सर्व वाहने थांबवून ठेवली