मुंबई - मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवाराबाबत मोठा निर्णय घेताना शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कट झाला आहे. विलास पोतनीस हे शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विधान परिषद आमदारकीची उमेदवारी न मिळाल्याने कार्यकाळ संपल्यानंतर दीपक सावंत यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक : आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कट, शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 7:57 PM