ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - अतिशय प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या अशा मुंबई महापालिकेसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. दरम्यान मुंबईतील सात विभागातील मतदानाचा आकडा जाहीर झाला आहे. आत्तापर्यंत बोरिवलीत सर्वाधिक म्हणजे९.९१% मतदान झाले असून मालाडमध्ये ८.५५ %, गोरेगांवमध्ये ८.६८ %, भांडूप ७.८८ %, घाटकोपर ४.६० % वरळी ८.०२ % आणि वांद्रे (पू) येथे ८.४३ % मतदान झाले आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यातीलल्या कलगीतुऱ्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरली असून शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्त्वाची लढाई ठरताना दिसत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी दोन हजार २७५ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईतील तब्बल ९५ लाख मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
दरम्यान आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मतदानाचा अधिकार बजावला.
Shiv Sena Chief Uddhav Thackeray, accompanied by his wife & son, queues up at a polling booth in Mumbai's Bandra East #BMCelectionpic.twitter.com/ra2jpP3jDi— ANI (@ANI_news) February 21, 2017