शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मुंबई-इंदूर १ तास ५६ मिनिटांमध्ये

By admin | Published: March 06, 2016 3:30 AM

इंदूरमधील २०वर्षीय तरुणाच्या हृदयामुळे ओडिशातील एका तरुणास जीवनदान मिळाले आहे. इंदूर ते मुंबईतील रुग्णालय असे ५४६ किमीचे अंतर केवळ १ तास ५६ मिनिटांमध्ये पूर्ण करून

मुंबई : इंदूरमधील २०वर्षीय तरुणाच्या हृदयामुळे ओडिशातील एका तरुणास जीवनदान मिळाले आहे. इंदूर ते मुंबईतील रुग्णालय असे ५४६ किमीचे अंतर केवळ १ तास ५६ मिनिटांमध्ये पूर्ण करून हे हृदय प्रत्यारोपणासाठी आणण्यात आले.इंदूर येथील एका २०वर्षीय तरुणाचा अपघात झाला. त्याच्या डोक्याला मार बसला होता. उपचारादरम्यान या तरुणाला ब्रेनडेड घोषित केल्यावर त्याच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्याच्या पालकांनी हृदय, यकृताचे दान केले. यकृत दिल्लीच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. तर, हृदय मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आले. २०वर्षीय तरुणाला इंदूरच्या चोटीराम रुग्णालयात ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यावर साडेबाराच्या सुमारास त्याचे हृदय काढण्यात आले. त्यानंतर १२ वाजून ४३ मिनिटांनी हृदय घेऊन डॉक्टर इंदूर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर १ तास ५६ मिनिटांमध्ये म्हणजेच २ वाजून १४ मिनिटांनी हृदय फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २२वर्षीय तरुणाला कार्डिओ मायोपॅथी हा आजार होता. या आजारामुळे त्याच्या हृदयाचे कार्य कमी झाले होते. त्यामुळे अंतिम पर्याय म्हणजे हृदयप्रत्यारोपण हाच होता. इंदूर येथील तरुणाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे या तरुणाला जीवनदान मिळाले. शस्त्रक्रियेनंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी) आता रुग्णाची प्रकृती स्थिरगेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. त्यानंतर हृदयप्रत्यारोपणाविषयी झालेल्या जनजागृतीमुळे आज १२वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. आता या मुलाची प्रकृती स्थिर आहे. पुढचे ४८ ते ७२ तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, असे हृद्यशल्यचिकित्सक डॉ. अन्वय मुळे म्हणाले.