ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण खूप चांगलं करतात, परंतु काम काही करत नाहीत अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. मुंबईत काँग्रेसचा महापौर हवा असं सांगत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वत: जातीनं लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सूचित केलं. मालाडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. तसेच उद्या मुंबईत वीज स्वस्ताईसाठी काँग्रेस पदयात्रा काढणार असून या पदयात्रेतही राहूल गांधी सहभागी हेणार आहेत.
मोदींनी स्वच्छ भारताचं स्वप्न दाखवलं, प्रत्यक्षात काही केलं नाही असं गांधी म्हणाले. तसेच मोदी सरकारने, शेतक-यांना व कामगारांना कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत असा आरोप त्यांनी केला.
राहूल गांधींच्या छोटेखानी भाषणातील मुद्दे:
- वीजेची महागाई कमी करण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणं आवश्यक आहे.
- मुंबई, महाराष्ट्र व दिल्लीत काँग्रेसचं सरकार आणू त्यासाठी जनतेत मिसळा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या.
- मुंबईचा महापौर काँग्रेसचा हवा त्यासाठी गरज वाटली तर मी पुन्हा पुन्हा पुन्हा मुंबईत येईन.
- घनकचरा व्यवस्थापन हे मुख्य आव्हान आहे, त्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही
- स्वच्छता हवी असेल, वीज स्वस्त हवी असेल तर काँग्रेसला निवडून द्या.
- मुंबई व महाराष्ट्राच्या धमन्यांमध्ये काँग्रेस रुजलेली आहे, गरज आहे ती लोकांच्या मनात ही भावना जागृत करण्याची.
Marketing बहुत अच्छी है, भाषण अच्छे देते है, लेकिन जब काम करने की बात होती है तब मोदी जी शांत हो जाते है।— Office of RG (@OfficeOfRG) January 15, 2016