मुंबई: मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. या दोन आठवड्यात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं पेडणेकर म्हणाल्या. (mumbai mayor kishori pednekar hints about lockdown)Exclusive: पुणेकरांना सर्वात आधी द्या कोरोना लस; मोदी सरकार घेणार का 'त्या' पत्राची दखल?गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर अतिशय सूचक भाष्य केलं. 'गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांचं प्रमाण अशाच प्रकारे वाढत राहिल्यास महापालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागतील,' असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होत असून मृत्यूचं प्रमाणदेखील दिसू लागल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं.
थोड्याच वेळात मुख्यमंत्री घेणार राज्यातील स्थितीचा आढावाकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडून जिल्ह्यांमधील परिस्थिती जाणून घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे.