मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा कहर कायम असल्याचे चित्र आहे. कोरोनाची परिस्थिती भयावह झाली असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. कोरोनाची गंभीर स्थिती असतानाही हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी हजेरी लावली असून, कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्यामहापौरकिशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्या भाविकांना क्वारंटाइन केले जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली. (mumbai mayor kishori pednekar says those returning from kumbh mela we are thinking of putting them under quarantine)
राज्यासह मुंबईतही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा साठाही अपुरा असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कुंभमेळ्यातून भाविक मुंबईत परत आल्यावर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
मुंबई परतल्यावर क्वारंटाइन करण्याचा विचार
कुंभमेळ्याहून परतणारे भाविक 'प्रसाद' म्हणून कोरोना घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी आपापल्या राज्यात स्वखर्चाने क्वारंटाईन व्हावे. मात्र, जे भाविक मुंबईत परततील, त्यांना क्वारंटाइन करण्याचा विचार आम्ही करत आहोत, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
“आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन
५ टक्के लोकांमुळे अनेकांना त्रास
जवळपास ९५ टक्के मुंबईकर कोरोना नियमांचे पालन करत आहेत. मात्र, ५ टक्के नागरिक नियमांचे उल्लंघन करतात. या लोकांमुळे इतर लोकांनाही त्रास होण्याची शक्यता असते. सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण लॉकडाऊन हाच प्रभावी उपाय ठरु शकतो, असे पेडणेकर यांनी यावेळी नमूद केले.
“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड
कोरोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने
शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.
निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.