मुंबई : ‘म्हाडा’च्यामुंबई मंडळाच्या वतीने ४ हजार ८३ घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, यासाठी ऑनलाइन अर्जाची सुरुवात २२ मे रोजी दुपारी ३ वाजल्यापासून होईल. २६ जूनच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असून, ऑनलाइन पेमेंट २६ जूनच्या रात्री ११:५६ वाजेपर्यंत करता येईल. आरटीजीएस/एनईएफटीद्वारे २८ जूनपर्यंत करता येईल. तर १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढली जाईल.
सदनिका विक्रीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस अर्जदारांना अर्ज रक्कम व अनामत रक्कम भरण्याकरिता लिंक खुली करण्यात येईल. ज्यामध्ये ‘म्हाडा’च्या बँक खात्याबाबतची माहिती नमूद करण्यात येईल.
सोडतप्रक्रियेत सहभागी होण्याकरिता https://www.mhada.gov.in तसेच https://housing.mhada.gov.in याच म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळांचा वापर करावा.
अर्ज शुल्क - ५०० जीएसटी - ९० एकूण - ५९०
कुठे किती घरे- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : १९४७ - म्हाडा : १७९५ - विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) : १३९ - विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) बांधकाम सुरू : ७५ - विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) २५ - विखुरलेल्या सदनिका १०२