मुंबई : मुंबईत १० हजारांच्या उंबरठ्यावर गेलेली रुग्णसंख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाली. मुंबईत रविवारी २ हजार ४०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. काल, शनिवारी ही संख्या २६ हजारांहून अधिक होती. रुग्णसंख्येसोबतच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.
मुंबईतील आजही कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक आहे. दिवसभरात ३ हजार ३७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ६ लाख १३ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९१ टक्के झाला आहे. मुंबईत दिवसभरात ३२ हजार ५९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील २ हजार ४०३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.मुंबईत २ मे ते ८ मे पर्यंत विचार केला असता मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.४४ टक्के इतका आहे. मुंबईत ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या ६ लाख ७६ हजार ४७५ बाधित रुग्णांपैकी १३ हजार ८९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात दिवसभरात ६० हजार २२६ रुग्ण कोरोनामुक्तराज्यात रविवारी दैनंदिन रुग्णांची संख्या ४८ हजार ४०१ इतकी होती. ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील २४ तासांत ६० हजार २२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ४४ लाख ७ हजार ८१८ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. सध्या ६ लाख १५ हजार ७८३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४ टक्के असून मृत्यूदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९४ लाख ३८ हजार ७९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ लाख ९६ हजार ८९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५१ लाख १ हजार ७३७ झाली असून, बळींचा आकडा ७५ हजार ८४९ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ५७२ मृत्यूंपैकी ३१० मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, तर १२६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
आतापर्यंत १ कोटी ७९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसराज्यात रविवारी दिवसभरात २ लाख ३६ हजार ९६० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, तर १८ ते ४४ वयोगटातील एकूण ३ लाख ८४ हजार ९९३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात एकूण आतापर्यंत १ कोटी ७९ लाख ७१ हजार ९९३ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ११ लाख २५ हजार ९६० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ६ लाख ६७ हजार ६३ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर १५ लाख ५८५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर ६ लाख १५ हजार ९९१ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. नागरिकांमध्ये आतापर्यंत १ कोटी २० लाख २२ हजार ३५० लाभार्थ्यांना पहिला डोस तर २० लाख ४० हजार ४४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.