ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलचे नोकरी आणि अन्य कायदेशीर मार्गाने मिळून उत्पन्न काही लाखांच्या घरात असू शकते. पण एका कॉन्स्टेबलकडे कोटयावधीच्या घरात संपत्ती असेल तर ? भ्रष्टाचार विरोधी पथकाने मुंबई पोलिस दलातील एक कॉन्स्टेबल आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात २.७७ कोटींच्या बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
नितीन श्रीरंग गायकवाड (४०) असे या कॉन्स्टेबलचे नाव असून त्याच्या विरोधात एसीबीला आधीच भ्रष्टाचाराची तक्रार मिळाली होती. पोलिसांच्या प्रोटेक्शन आणि सिक्युरीटी ब्रांचमध्ये ते २००८ पासून २०१४ मध्ये तैनात होते. नितीन गायकवाड नोकरीतून निवृत्त होताना कायदेशीररित्या त्याचे जितके उत्पन्न असले पाहिजे त्यापेक्षा ८८३ टक्के जास्त संपत्ती त्याच्याकडे आढळली.
गायकवाड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर अनेक फ्लॅटस, दागिने आणि विविध बँक खात्यांमध्ये पैसा आहे. नितीनची पत्नी मनिषालाही आरोपी करण्यात आले असून, पुढील चौकशी सुरु आहे.